IMPIMP

Pune Crime News | पुण्यात कोयते उगारून दहशत निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई – पोलिस आयुक्त रितेश कुमार (Video)

by nagesh
Pune Crime News | Strict action will be taken against those who created terror in Pune - Police Commissioner Ritesh Kumar (Video)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईनन – Pune Crime News | भररस्त्यात आणि गर्दीच्या ठिकाणी कोयते नाचवत दहशत निर्माण करणार्‍यांच्या विरोधात
कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Retesh Kumaarr) यांनी दिले आहेत. पुणे पोलिस दलातील उपायुक्त, सहाय्यक
आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांची आज पोलिस आयुक्तालयात बैठक पार पडली. त्या बैठकीत पोलिस आयुक्तांची सर्व अधिकार्‍यांना
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांनी प्लॅनिंग केल्याचं देखील आयुक्तांना
स्पष्ट केलं आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गेल्या काही काळामध्ये शहरात कोयते हातात नाचवत परिसरात दहशत निर्माण करण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कोयते हातात नाचवत कोयता गँग (Koyta Gang Pune) शहरात दहशत निर्माण केल्याच्या घटना वाढल्याने पत्रकारांनी अशा घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून नेमकी काय उपाययोजना करण्यात येणार आहे असे विचारण्यात आले होते. त्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार बोलत होते. सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांना दहशत निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) MCOCA आणि झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) PMDA सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर गेल्या 5 ते 6 वर्षात परिसरात दहशत निर्माण करणार्‍यांची लिस्ट काढून त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune Crime News)

 

 

16 ते 18 वर्षाच्या दरम्यानची मुले देखील गुन्हेगारी करताना दिसत आहेत. याबाबत पोलिस आयुक्त (Pune CP Retesh Kumaarr) म्हणाले की, अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यातील तरतुदींचा आधार घेण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमीवर असणार्‍या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या अल्पवयीन मुलांवर कारवाई देखील होणार असून त्यांचे समुपदेशन देखील केले जाणार आहे. आगामी 2 ते 3 महिन्यात याचे परिणाम पाहायला मिळतील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Strict action will be taken against those who created terror in Pune – Police Commissioner Ritesh Kumar (Video)

 

हे देखील वाचा :

Rajasthani Pravasi Samaj | पुणे ते जोधपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करा ! अखिल राजस्थानी समाज संघाचे रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन

Maharashtra State Police Sports Competition On Pune | पुण्यात महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा शनिवारपासून प्रारंभ, 13 संघांचा समावेश

MP Sanjay Raut | ‘प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या…’, संजय राऊतांचा राणेंना टोला

 

Related Posts