IMPIMP

MP Sanjay Raut | ‘प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या…’, संजय राऊतांचा राणेंना टोला

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut targets narayan rane over ajit pawars criticism of nitesh rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MP Sanjay Raut | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत खोचक शब्दात टीका केली होती. यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे असे राणे म्हणाले होते. यावर अजित पवार यांना विचारले असता, टिल्ल्या लोकांवर बोलायची गरज नाही, त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील असे सांगितले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देखील राणेंवर टीका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी त्याला पूर्ण नागडा करेन

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, अजित पवारांनी फार समर्पक अशी उपमा दिली आहे. यांची (राणे) बुद्धी तेवढीच आहे टिल्ली. हा प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या बुद्धीचा आहे. मी अशाप्रकारची भाषा कधी वापरत नाही. पण आता वापरली आहे. याला जबाबदार सर्वस्वी नारायण राणे (Narayan Rane) हा माणूस आहे आणि यापुढे जर तो बोलत राहिला, तर मी त्याला पूर्ण नागडा करेन. ये तुझी पोरं येताय तर पोरांना येऊ दे, तू येतोस तर तू ये. ये मैदानात, केंद्राची सुरक्षा घेऊन फिरतोय, हिंमत आहे तर एकटा फिर, स्वत:ला मोठा भाई समजतोस, अशा शब्दात राऊतांनी राणेंवर हल्लाबोल केला.

 

राणे माझ्या नादाला लागू नकोस

कोणत्या अग्रलेखाबद्दल म्हणताय तुम्ही? वाचा नीट. परत सांगतो नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस. आता मी कालपर्यंत गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस. तुझ्यासारखे आले 56 आणि गेले. नामर्द माणूस आहेस तू ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) भीतीने पळून गेलास. तू आम्हाला लढायच्या गोष्टी काय सांगतोस. तुझी लायकी आहे का? अशा शब्दात संजय राऊतांनी नारायण राणेंवर प्रहार केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut targets narayan rane over ajit pawars criticism of nitesh rane

 

हे देखील वाचा :

Pune Traffic Police | पार्किंग व नो-पार्किंगबाबत वाहतूक शाखेकडून आदेश जारी

MP Sanjay Raut | अजामीनपात्र वॉरंट जारी होताच संजय राऊत कोर्टात हजर, कोर्टानं वॉरंट केलं रद्द

Abdul Sattar | अब्दुल सत्तारांचा अंबादास दाणवेंवर पलटवार म्हणाले, ‘यांना तर…’

 

Related Posts