IMPIMP

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन आरोपींच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

by nagesh
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   – Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील (MCOCA) Mokka आरोपी संतोष पवार (Santosh Pawar) याला पुणे
ग्रामीण हद्दीतील खानापूर येथे तपासा करीता आणले असता आरोपीने पोलिसांना ढकलून देत पलायन केले होते. यामध्ये आरोपीला पळून जाण्यास मदत
करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट चारच्या (Crime Branch Unit-4) पथकाने अटक (Arrest) केली आहे. ही
कारवाई (Pune Crime News) बोपोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रणव उर्फ चिक्या अर्जुन रणधीर (वय-19), तन्मय उर्फ पिल्लुड्या तानाजी धिवार (वय-19 दोघे रा. बुद्ध वस्ती, खानापुर, ता. हवेली) असे अटक करण्यात (Pune Crime News) आलेल्या आरोपींची नावे आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील (Market Yard Police Station) मोक्का गुन्ह्यातील आरोपी संतोष बाळु पवार (वय-22 रा. खानापुर) व साई राजेंद्र कुंभार (वय-19) यांना तापासा करीता खानापूर (Khanapur) येथे आणले होते. त्यावेळी संतोष पवार याने पोलिसांना ढकलून, त्याच्या हातातील बेडीने जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांना मारहाण करुन पळून गेला होता. आरोपीला पळून जाण्यासाठी चिक्या आणि पिल्लुड्या यांनी मदत केली होती. आरोपींनी पवार याला स्कुटरवर ट्रिपल सीट बसवून पळून जाण्यास मदत केली होती.

 

संतोष पवार याला पळून जाण्यात मदत करणारे दोन आरोपी दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळील पान टपरी जवळ उभे असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी आरोपींना हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane), सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र पवार (API Mahendra Pawar), पोलीस पोलीस अंमलदार संजय आढारी, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | The crime branch of the two accused who helped the accused in the Mokka crime escape

 

हे देखील वाचा :

Chinchwad Bypoll Election | ‘मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे’; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

Snehal Shidam – Nikhil Bane | स्नेहल शिदमनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे निखिल बनेच्या आणि तिच्या अफेअरची चर्चा सुरू

Amruta Khanvilkar | केवळ चार शब्दातच अभिनेत्री अमृता खानविलकरने केले ट्रॉलर्सचे तोंड बंद; व्हिडिओ व्हायरल

 

Related Posts