IMPIMP

Pune Crime News | पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन महिलेचा विनयभंग, सराईत गुन्हेगार FIR; कोंढवा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Woman molested by threat to implicate husband in false crime, Sarait criminal FIR; Incidents in Kondhwa area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पतीला मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत महिलेसोबत अश्लील
बोलून विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगारावर (Criminal) गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार (Pune Crime News) शनिवारी (दि.4) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 30 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. तर वसीम रशीद हजारी उर्फ लाला (Wasim Rashid Hazari alias Lala) याच्यावर आयपीसी 364,507 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपी वसीम हा कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी आणि फिर्यादी यांचे पती हे एकाच कंपनीत काम करतात.
एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते.
आरोपीने फिर्यादी यांना मोबाईलवर फोन करुन अश्लील भाषेत बोलला.
तसेच फिर्यादी यांच्या पतीला मारण्याची (Kill) व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी (Threat)
दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत फिर्यादी यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.
अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Woman molested by threat to implicate husband in false crime, Sarait criminal FIR; Incidents in Kondhwa area

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोंढवा पोलिसांचा छापा, 5 लाख 73 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक; सप्लायर साकीम उर्फ गुड्डू खानचा शोध सुरू

Shivani Baokar | ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेत्री शिवानी बावकर लवकरच ‘या’ नव्या मालिकेत दिसणार; साकारणार एकदम डॅशिंग भूमिका

Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | पोटनिवडणूकीसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती स्थापन; कसबा पेठ व चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी, पत्रकार अनिल सावळे यांच्यासह 5 जणांची नियुक्ती

 

Related Posts