IMPIMP

Pune Crime | 42 वर्षीय महिला डॉक्टरच्या लैंगिक संबंधाबाबत व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर मॅसेज; अश्लिल संभाषण करणारा पुण्यातील डॉक्टर ‘गोत्यात’

by nagesh
pune crime | pune police arrest Dr. Satish Kolsure in molestation case of 42 years lady doctor

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | 42 वर्षीय महिला सहकारी डॉक्टरांविषयी (lady doctor) अफवा पसरवुन त्यांच्याविषयी व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर मेसेज करुन त्यांच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज करुन विनयभंग (molestation case) करणार्‍या डॉक्टराला पुणे पोलिसांनी अटक केली (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

डॉ. सतीश कोळसुरे Dr. Satish Kolsure असे अटक केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. कामावर असतानाच डॉक्टरला अटक केल्याने परिसरात मोठी चर्चा सुरु झाली. याबाबत महिला डॉक्टरने पोलीस ठाण्यात (गु. र. नं. 177/21) गुन्हा फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील एका व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर एका वरिष्ठ महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान या डॉक्टरांनी केले होते. याबाबत त्यांनी एका आरोग्य निरीक्षक दर्जाच्या अधिकारी यांना देखील अश्लील शिवीगाळ व धमकी दिली होती.

तसेच ता 4 ऑक्टोबर रोजी या डॉक्टर महिलेला मनात लज्जा उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह विधान अनेकदा त्यांच्यातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर केले. पुणे महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या काही महिला डॉक्टर व नर्स या ग्रुपच्या सदस्या आहेत. त्या सर्वांनीच हा मेसेज पहिला व त्या सर्वांच्याच मनात याबद्दल लज्जा उत्पन्न होईल असे ते वक्तव्य होते. एका वरिष्ठ डॉक्टरांच्या बद्दल असे जाहीर घाणेरडे जाहीर वक्तव्य केल्याप्रकरणी डॉक्टराविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला. गुरूवारी दुपारी त्यांना त्यांच्या ओपीडीत असताना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलिस निरीक्षक करीत आहेत.

 

Web Title :- pune crime | pune police arrest Dr. Satish Kolsure in molestation case of 42 years lady doctor

 

हे देखील वाचा :

44 कोटी SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! उद्यापासून 3 दिवस ‘या’ वेळेत करू शकणार नाही पैशांचा व्यवहार; जाणून घ्या का?

स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी! ‘या’ बँकेनं Home Loan वर व्याजदरात केली कपात, प्रोसेसिंग फी सुद्धा नाही; जाणून घ्या

खुशखबर ! या नवरात्रीत Paytm वरून गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या काय आहे ऑफर?

 

Related Posts