IMPIMP

Pune Crime | कर्वेनगर परिसरातील मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
 Pune Crime | The crime branch arrested the criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मंदिरात चोरी (Theft In Temple) करणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने सापळा रचून अटक (Arrest) केली. सोमनाथ किसन भोसले (Somnath Kisan Bhosale) आणि ज्ञानेश्वर रावसाहेब सोनवणे (Dnyaneshwar Raosaheb Sonawane) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींकडून कर्वेनगर (Karvenagar) येथील दोन मंदिरातून चोरी केलेले सोन्याचे दागिने (Gold Jewelry) आणि दान पेटीमधील रक्कम असा एकूण 18 हजार 234 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने वारजे माळवाडी येथील गणपती माथा बस स्टॉप येथून आरोपींना अटक केली. सोमनाथ भोसले (रा. न्यु कोपरे उत्तमनगर, पुणे) आणि ज्ञानेश्वर सोनवणे (रा. न्यु तहसीलदार कार्यालय, ता. मंगळवेढा जि. सोलापुर – Solapur) यांना अटक करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Crime)

 

युनिट तीनचे पोलीस कर्मचारी वारजे – माळवाडी (Warje – Malwadi Police Station), उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttam Nagar Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करुन संशयीत व्यक्ती आणि खासगी वाहने तपासत होते. त्यावेळी पथकातील अंमलदार यांना माहिती मिळाली की, गणपती माथा बस स्टॉप येथे दोनजण थांबले असून ते मंदिरात (Temples In Pune) चोरी करण्याबाबत बोलत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

 

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी कर्वेनगर येथील श्री मारुती भैरोनाथ ट्रस्टचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर व विठेश्वर ट्रस्ट विठ्ठल रुक्मिणी मंदीरात चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून बेन्टेक्स दागिने व सोन्याचे दागिने तसेच दानपेटी फोडुन चोरी केलेली रोख रक्कम असा एकूण 18 हजार 234 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून वारजे माळवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकी आले असून त्यांना वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार (PSI Tejaswi Pawar),
पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, संजीव कळंबे, विल्सन डिसोझा, राकेश टेकावडे,
ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, कल्पेश बनसोडे, प्रताप पडवाळ, सतिश कत्राळे, भाग्यश्री वाघमारे, सोनम नेवसे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests two for stealing from a temple in Karvenagar area of Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘जपानमधून 100 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करतो’ असे सांगून व्यापाऱ्याला 34 लाखांना गंडा

Pune Crime | 8 वर्षाच्या मुलाचा निघृण खून, घराजवळ आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

Pune Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर’ ! सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवत तरुणीचा घेतला चावा, येरवड्यातील घटना

 

Related Posts