IMPIMP

Pune Crime | 8 वर्षाच्या मुलाचा निघृण खून, घराजवळ आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एका आठ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून निर्घृण खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना चिखली (Chikhali) येथे रविवारी (दि.17) रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण देवासी Laxman Devasi (वय – 8 रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. लक्ष्मण याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात आढळून (Pune Crime) आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर (Senior Police Inspector Vasant Babar) यांनी दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण रविवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता.
त्याच्या आई – वडिलांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
अखेर रात्री चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत सातच्या सुमारास मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.(Pune Crime)

 

पोलीस आणि लक्ष्मणचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. त्यावेळी त्याच्या रहात्या घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत लक्ष्मणचा मृतदेह (Dead Body) आढळून आला.
त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली. देवासी कुटुंब हे मुळचे राजस्थान (Rajasthan) येथील असून लक्ष्मणच्या वडिलांचे किराणामालाचे दुकान आहे.
पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 8 year boy killed in pimpri chinchwad pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर’ ! सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवत तरुणीचा घेतला चावा, येरवड्यातील घटना

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा झटका ! मिळणार नाही 18 महिन्यांचा DA Arrears, मोदी सरकारचा नकार

 

Related Posts