IMPIMP

Pune Crime | वीज कट केल्याने महावितरणच्या अधिकार्‍याला बेदम मारहाण, केले फ्रॅक्चर

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | बील न भरल्याने वीज पुरवठा खंडीत केल्याने महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला  स्टीलच्या रॉडने मारहाण करुन त्याचे बोट फ्रॅक्चर करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश विठ्ठल इंडे (वय ३९) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३६०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुशिल जालिंदर नवले (वय ३५, रा. पराशर सोसायटी, पठारे वस्ती, नगर रोड) याला अटक केली आहे. ही घटना पराशर सोसायटीत बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजता घडली. (Pune Crime)

 

फिर्यादी हे महावितरण कंपनीत अधिकारी असून त्यांचे शाखा कार्यालयामार्फत ते पराशर सोसायटीत वीज बिल भरणा
केला आहे की नाही हे पाहण्यासाठी गेले होते.
यावेळी सुशिल नवले याचे वीज मीटरचे कनेक्शन कट केल्याचा राग असल्याने त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन घरातील स्टीलच्या रॉडने मारहाण केली. त्यात त्यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले.
आमच्या एरियात लाईनमन आला तर मी त्याचे हात पाय मोडीन. त्याला सोडणार नाही असे म्हणून धमकी दिली.
पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करुन नवले याला अटक केली
आहे.
सहायक पोलीस निरीक्षक पाठक अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | The Mahavitran officer was brutally beaten and fractured due to power cut

 

हे देखील वाचा :

Viral Video News | हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडून पत्नीकडून पतीला मारहाण

Bharti Jaffrey Passed Away | अभिनेते अशोक कुमार यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री भारती जाफरी यांचे निधन

Shivsena Uddhav Thackeray Mission BMC | ‘मिशन बीएमसी’साठी शिवसेनेने आखली खास रणनीती

Modi Govt – Logistics Park | मोदी सरकारकडून मराठवाडा-विदर्भासाठी मोठे गिफ्ट, लॉजिस्टिक पार्कच्या ड्रीम प्रोजेक्टचा करार झाला फायनल

 

Related Posts