IMPIMP

Shivsena Uddhav Thackeray Mission BMC | ‘मिशन बीएमसी’साठी शिवसेनेने आखली खास रणनीती

by nagesh
 Shivsena | shivsena slams in saamana editorial bjp govt over miss management in pune after heavy rain

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   –  Shivsena Uddhav Thackeray Mission BMC | काही दिवसांवर मुंबई महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यातच आता शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Elections of Mumbai Municipal Corporation) शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी मुंबईमध्ये गटप्रमुखांच्या मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात त्यांनी बूथ जिंका निवडणूक जिंका, असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी दिला आहे. शिंदे गट आणि भाजप (BJP) विरोधात उद्धव ठाकरेंनी आक्रमक रणनीती आखली आहे. (Shivsena Uddhav Thackeray Mission BMC)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपसारखी रणनीती आखली आहे. भाजपनेही 2014 पासून पन्ना प्रमुख आणि बूथ प्रमुख नेमून या प्रमुखांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. भाजपच्या या रणनितीचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावर झाला. उद्धव ठाकरे यांनीही अशाचप्रकारे बूथ जिंका, निवडणूक जिंका, अशी रणनीती अवलंबली आहे.

 

तसेच काही दिवसांवर दसरा मेळावा (Dussra Melava) येऊन ठेपला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे
शिवसैनिकांना काय आवाहन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला मुंबई महापालिकेने अजूनही ठाकरेंना परवानगी दिलेली नाही.
हि परवानगी मिळावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

 

Web Title :- Shivsena Uddhav Thackeray Mission BMC | uddhav thackeray mission bmc tells shivsainiks to concentrate on booth

 

हे देखील वाचा :

Modi Govt – Logistics Park | मोदी सरकारकडून मराठवाडा-विदर्भासाठी मोठे गिफ्ट, लॉजिस्टिक पार्कच्या ड्रीम प्रोजेक्टचा करार झाला फायनल

Kidney Stone | नवजीवन ॲग्रो अँड फार्माचे मुतखड्यावर खात्रीशीर रामबाण उपाय ‘नवजीवन स्मॅशस्टोन’

Aurangabad Crime | गुन्हे शाखेची मोठी कारवाई! औरंगाबादमधील पगारिया ऑटोत दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

 

Related Posts