IMPIMP

Pune Crime | विमान तिकीटाचे पैसे मागितल्यास आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची ट्रॅव्हल्स कंपनी मालकाची धमकी

by nagesh
Pune Crime | A case of fraud has been registered against builders Mahesh Thorat and Shirish Lodha in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | विमानाची तिकीटे घेण्यासाठी १४ लाख ५० हजार रुपये दिले असताना तिकीटे न दिल्याने पैसे परत मागितल्यावर जीवे ठार मारण्याची व स्वत: आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाने दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) हर्षा अजय पंचाल (रा. पुरणमल शॉपिंग सेंटर, कांदिवली, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याबाबत रोहन भरत चंगेडे (वय ३४, रा. महर्षीनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (१३२/२१) फिर्याद दिली आहे. हा प्रकार काकडे बिल्डिंगमध्ये २०१९ ते २४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

फिर्यादी यांनी हॅलो ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक हर्षा पंचाल याच्याकडे १४ लाख ५० हजार रुपये देऊन त्यांना विमानाची तिकीटे बुक करण्यास दिले होते.
त्यांनी विमानाची तिकीटे न दिल्याने फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा आरोपीने पैसे देण्यास नकार दिला.
तसेच पैसे मागितल्यास जीवे ठार मारण्याची व स्वत: आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी दिली.
त्यामुळे शेवटी चंगेडे यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Travels owner threatens to commit suicide by asking for air ticket money

 

हे देखील वाचा :

Mutual Funds SIP | ‘या’ ब्ल्यूचिप फंड्सने शानदार दिला रिटर्न; जाणून घ्या 5 वर्षात किती केली ‘कमाई’

Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत इंजिनिअर्सच्या 139 जागांसाठी भरती; जाणून घ्या

Dilip Walse Patil | समीर वानखेडेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेशी ‘जुजबी’ चर्चा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

 

Related Posts