IMPIMP

Pune Kasba Peth Bypoll Elections | कसबा विधानसभा पोटनिवडणूक ! भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर; उमेदवारी डावलल्याने टिळक कुटुंंबिय नाराज

by nagesh
Pune Kasba Peth Bypoll Elections | Kasba Assembly by-election! BJP announces Hemant Rasane's candidacy; The Tilak family is upset with the cancellation of the candidature

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Elections | कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे. ६ फेब्रुवारीला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, आमदार स्व. मुक्ता टिळक यांचे पति शैलेश टिळक यांना उमेदवारी नाकारल्याने टिळक (Shailesh Tilak) कुटुंबियांमध्ये नाराजी पसरली असून याचे पडसाद निवडणुकीच्या निकालात उमटण्याची चिन्हे आहेत. (Pune Kasba Peth Bypoll Elections)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक (Late MLA Mukta Tilak) यांचे डिसेंबरमध्ये कर्करोगाने निधन झाल्याने या मतदारसंघामध्ये २६ फेब्रुवारी रोजी पोट निवडणुक होत आहे. साधारणपणे विद्यमान आमदाराच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी दिली जाते, अशी आजपर्यंत सर्वच राजकिय पक्षांची कार्यपद्धती राहीली आहे. चिंचवड मतदारसंघामध्ये भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी अश्‍विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्याच धर्तीवर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक अथवा चिरंजीव कुणाल टिळक (Kunal Tilak) यांना उमेदवारी मिळेल अशी अटकळ लावण्यात येत होती. शैलेश टिळक यांनी निवडणुक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली होती. परंतू आज सकाळी भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाने कसबा पोटनिवडणुकीसाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करत कार्यपद्धतीला फाटा दिला आहे. (Pune Kasba Peth Bypoll Elections)

 

हेमंत रासने यांनी चारवेळा महापालिकेमध्ये प्रतिनिधीत्व केले असून भाजपच्या सत्ता काळात सलग चारवेळा त्यांना स्थायी समिती अध्यक्षपदावर संधी मिळाली आहे. महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षपद सलग भुषविण्याची संधी मिळालेले ते एकमेव नगरसेवक आहेत. यासोबतच श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्‍वस्त, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहात आहेत. रासने यांच्या व्यतिरिक्त माजी सभागृहनेते धीरज घाटे, गणेश बिडकर हे देखिल उमेदवारीच्या स्पर्धेत होते.

 

दरम्यान, दोनच दिवसांपुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांची पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली. त्याचवेळी टिळक कुटुंबियांना निवडणुकीत संधी मिळणार नाही, हे शंका निर्माण झाली होती. काल एका कार्यक्रमानिमित्त येथे आलेेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाड्यात जाउन टिळक कुटुंबियांची भेट घेतली. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी आलेले फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची सात्वंनासाठी भेट घेतली नव्हती, त्यामुळे काल ते टिळकांच्या घरी गेले होते, असे सांगण्यात आले होते. परंतू आज उमेदवारी जाहिर केल्यानंतर कुणाल टिळक यांची प्रवक्तेपदी नियुक्ती असो अथवा काल फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेली भेट असो, ही शैलेश टिळक यांना उमेदवारी नाकारण्यासाठीच केलेली चाल होती, हे आता स्पष्ट झाले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शैलेश टिळक म्हणाले मुक्ता टिळक यांचे अर्धवट स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत.
आम्हाला आशा वाटत होती की आम्हाला उमेदवारी मिळेल पण पक्षाने वेगळा विचार केला.
मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाला. पुणे शहरात आज कुठलाही ब्राम्हण उमेदवार नाही.
त्यामुळे ब्राम्हण समाजावर अन्याय झाल्याची भावना आहे आणि हीच भावना लोकांच्या मनात असण्याची
शक्यता आहे. परंतू पक्षाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही पक्षासोबतच राहू.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Elections | Kasba Assembly by-election! BJP announces Hemant Rasane’s candidacy; The Tilak family is upset with the cancellation of the candidature

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | जंगली महाराज रस्त्यावरून 3 मुले बपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

Sara Ali Khan-Kartik Aaryan | ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार सारा-कार्तिक; ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

BCCI | बीसीसीआय लवकरच करणार मोठी घोषणा; ‘या’ खेळाडूंना लागेल लॉटरी तर ‘हे’ खेळाडू होऊ शकतात बाहेर

 

Related Posts