IMPIMP

Pune-Kothrud Shopping Fest | रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने आयोजित कोथरूड शॉपिंग फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद

by nagesh
Pune-Kothrud Shopping Fest | Spontaneous response to the Kothrud Shopping Fest organized by the Rotary Club of Pune Gandhi Bhavan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune-Kothrud Shopping Fest | महिला नवउद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भरवण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या (Rotary Club of Pune Gandhi Bhavan) कोथरूड शॉपिंग फेस्टला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उन्हाची तीव्रता असतानाही कोथरूडकरांनी महिला नव उद्योजिकांना प्रोत्साहन दिले. (Pune-Kothrud Shopping Fest)

सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून महिला नव उद्योजिका आणि सेवाभावी संस्था यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २ भरवण्यात आले होते. रोटरियन डॉ. ऋचा वझे – मोकाशी (Dr. Rucha Vaze Mokashi) यांच्या संकल्पनेतून या ‘कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २’ भरवण्यात आले. यामध्ये रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे अध्यक्ष रोटरियन पद्मजा जोशी (Padmaja Joshi), सचिव रोटरियन अश्विनी शिलेदार (Ashwini Shiledar), पुष्कर मोकाशी (Pushkar Mokashi), शशांक टिळक (Shashank Tilak), मनीष धोत्रे (Manish Dhotre), दीपा पुजारी (Deepa Pujari), प्रसाद पुजारी (Prasad Pujari) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. (Pune-Kothrud Shopping Fest)

 

 

याविषयी माहिती देताना डॉ. ऋचा वझे – मोकाशी म्हणाल्या, महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व सामाजिक कार्याला हातभार लावण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या शॉपिंग फेस्ट मध्ये १०० हून अधिक महिला नव उद्योजिकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्घाटन प्रसंगी केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी आणि कोथरूडवासीयांनी प्रतिसाद देत हा फेस्ट यशस्वी केला.

 

 

दरम्यान, कोथरूड शॉपिंग फेस्ट मध्ये अभिनेत्री विभावारी देशपांडे (Vibhawari Deshpande) यांची प्रमुख
भूमिका असलेल्या, महिला उद्योजकांवर आधारीत ‘बटरफ्लाय’ या चित्रपटांचे प्रमोशन करण्यात आले.
याशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेटी दिल्या.

 

रोटरी क्लब गांधी भवन मागील २२ वर्षांपासून कार्यरत असून या काळात क्लबने विविध सामाजिक कार्यात
सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाचे सुवर्ण प्रायोजक गंगोत्री हॉलिडे आणि होम्स,इव्हेंट प्रायोजक वासू इव्हेंट्स
तर पावर्ड बाय क्रिस्टल किया आणि खादी वर्ल्ड आहेत.

Web Title : Pune-Kothrud Shopping Fest | Spontaneous response to the Kothrud Shopping
Fest organized by the Rotary Club of Pune Gandhi Bhavan

Related Posts