IMPIMP

Pune Lingana Fort | पुण्यातील लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंग करताना हार्ट अटॅक, 62 वर्षीय ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू

by nagesh
Pune Lingana Fort | panvel trekker dies of heart attack while trekking

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  सुट्टीच्या दिवशी अनेकजण ट्रेकिंगसाठी (Trekking) जात असतात. यामध्ये पुणे (Pune) आणि रायगड जिल्ह्यात
(Raigad District) असलेल्या किल्ल्यांना पसंती दिली जाते. अनेक ट्रेकर्सचे ग्रुप याठिकाणी ट्रेकिंगसाठी येत असता. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या
लिंगाणा किल्ल्यावर (Pune Lingana Fort) ट्रेकींगसाठी राज्याच्या विविध भागातून ट्रेकर्स येत असतात. असाच एक ग्रुप पनवेल येथून आला होता. हा
ग्रुप लिंगाणा किल्ल्याच्या (Pune Lingana Fort) पायथ्याशी आला असता या ग्रुपमधील एका ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजय काळे Ajay Kale (वय-62) असे मृत्यू झालेल्या ट्रेकरचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर लिंगाणा किल्ला (Pune Lingana Fort) आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून (Velhe Taluka) मार्ग आहे. रविवारी पनवेल येथील एक ग्रुप या मार्गाने लिंगणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. 6 ते 7 जणांच्या या ग्रुपमध्ये अजय काळे हे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी ट्रेकर्स होते. ट्रेकिंग करताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

अजय काळे हे मागील 30 ते 32 वर्षांपासून ट्रेकिंग करत होते. त्यांनी आजपर्यंत अनेक गड-किल्ले सर केले आहेत.
रविवारी जो ग्रुप आला होता, त्या ग्रुपमध्ये ते मार्गदर्शक म्हणून आले होते. ते लिंगाण्यावर जाणार नव्हते.
फक्त मार्गदर्शन करणार होते. मात्र, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

 

 

Web Title :-  Pune Lingana Fort | panvel trekker dies of heart attack while trekking

 

हे देखील वाचा :

Maharashtra Minister Tanaji Sawant | महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस अन् माझ्यात 150 बैठका; तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

Mahanirmiti-Mission Samarth | ‘मिशन समर्थ’ अंतर्गत महानिर्मितीच्या जैव इंधन कार्यशाळेचे उद्घाटन; जैव इंधनाची गुणवत्ता आणि घनता यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन, फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात

 

Related Posts