IMPIMP

Former MLA Mohan Joshi | पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज ! पुरंदर विमानतळ प्रश्न समन्वयाने सुटावा – माजी आमदार मोहन जोशी

by nagesh
Girish Bapat | BJP leader and MP girish bapat criticized to sharad pawar dont move pune lohegaon airport pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Former MLA Mohan Joshi | शहरातील उद्योग, व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची (Pune International Airport) गरज आहे. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून पुरंदर विमानातळाचा (Purandar Airport) प्रस्ताव मार्गी लावावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गेल्या काही वर्षात पुणे शहर वेगाने विस्तारते आहे. पुणे आणि परिसरात औद्योगिक क्षेत्रातील (MIDC Pune) मोठे, मध्यम आणि लघु उद्योगांची संख्या २ लाखांहून अधिक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोनशे कंपन्या असून हा उद्योगही वाढत आहे. या अनुषंगाने व्यापारसुध्दा वाढत चालला आहे. अशा वेळी पुण्याची अन्य शहरे, राज्ये, परदेशातील २५ महत्वाची शहरे यांच्याशी कनेक्टीव्हीटी वाढणे जरुरीचे आहे. याकरिता पुण्यालगत आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे आहे.

 

गेली काही वर्ष खेड (Khed), पुरंदर (Purandar) अशा जागांच्या निश्चितीत गेली, आता विमानतळ प्रस्ताव बारगळल्यात जमा होणे पुण्यासाठी परवडणारे नाही. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय साधून लवकरात लवकर सर्वमान्यतोडगा काढावा आणि विमानतळाचे काम सुरू करावे, असे आवाहन मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केले आहे.
याबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

 

Web Title : Pune needs an international airport! Purandar airport issue should be resolved through coordination – Former MLA Mohan Joshi

 

हे देखील वाचा :

Online Money Transfer | आता तुम्ही PPF, सुकन्या समृद्धी योजना (SSY) खात्यात ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकता

Rakesh Jhunjhunwala New House | राकेश झुनझुनवाला राहणार 14 मजली आलिशान महालात, ‘हा’ आहे मुंबईचा सर्वात महागडा परिसर

Omicron Symptoms | ओमिक्रॉन संसर्गाच्या तीन दिवसानंतर दिसू लागतात ‘ही’ लक्षणे; जाणून घ्या

 

Related Posts