IMPIMP

Pune News | ‘अभिव्यक्ती’ द्वारे नृत्य महोत्सवाचा २८ एप्रिल रोजी समारोप

३ ज्येष्ठ नृत्य गुरूंची २८ रोजी ' अभिव्यक्ती', शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेचे आयोजन

by nagesh
Pune News | Dance festival concluded on 28th April by 'Abhivyakti'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune News | जागतिक नृत्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने आयोजित ‘पुणे डान्स सीझन -२0२३’ (Pune Dance Season -2023) या नृत्य महोत्सवाचा समारोप शुक्रवार, दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह ( मयूर कॉलनी, कोथरूड – Kothrud) येथे होणार आहे. भरतनाट्यम आणि कथक नृत्य क्षेत्रातील ज्येष्ठ नृत्य गुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर (Dr. Sucheta Bhide-Chapekar), मनीषा साठे (Manisha Sathe), शमा भाटे (Shama Bhate) या त्रिमूर्ती शास्त्रीय नृत्य (Classical Dance) सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका २६ एप्रिलपासून कार्यक्रम स्थळी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या वतीने रसिका गुमास्ते, अरूंधती पटवर्धन यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन असल्याने त्याच्या पूर्व संध्येला म्हणजे २८ एप्रिल रोजी ‘अभिव्यक्ती’ चे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

२२ एप्रिल पासून आठवडाभर या नृत्य महोत्सवाचे कार्यक्रम घेण्यात आले. डान्सजत्रा, सिंहगड ट्रेक आणि नृत्य, खिद्रापूर मंदिराची सहल आणि नृत्य, नवोन्मेष, स्पर्धा, कार्यशाळा असे विविध उपक्रम या नृत्य महोत्सवात आयोजित करण्यात आले.त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

 

 

Web Title :-  Pune News | Dance festival concluded on 28th April by ‘Abhivyakti’

 

हे देखील वाचा :

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : मिळकतकराची बिले 1 मे पासून नव्हे तर ‘या’ तारखेपासून मिळणार, 15 जुलैपर्यंतच मिळणार सवलत

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : बीपी (उच्च रक्तदाब), शुगर (मधुमेह) साठीची 6 प्रकारची औषधे मिळणार मोफत

Pune PMC News | नदीकाठ सुधार योजनेत केवळ १ हजार ७३४ बाभळी, सुबाभळीची झाडे काढण्यात येणार

 

Related Posts