IMPIMP

Pune PMC News | नदीकाठ सुधार योजनेत केवळ १ हजार ७३४ बाभळी, सुबाभळीची झाडे काढण्यात येणार

साडेतीन हजार झाडांचे पुर्नरोपण करणार असून ६५ हजार झाडे नव्याने लावणार : महापालिका प्रशासन

by nagesh
 Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | नदी काठ सुधार योजनेत दहा हजार नाही तर १ हजार ७३४ झाडे काढली जाणार आहे, तसेच ६५ हजार झाडे नव्याने लावली जातील असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला गेला आहे. हा दावा करताना प्रशासनाकडून पर्यावरणप्रेमींचा उल्लेख करणे टाळले आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नदी काठ सुधार योजनेत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे, यामुळे नैसर्गिक परीसंस्था धोक्यात येत असल्याचा दावा करीत पर्यावरणवादी, पर्यावरणप्रेमी, कार्यकर्त्यांनी पर्यावरण दूत हे पुरस्कार महापालिकेला परत दिले. त्यांच्या पुरस्कार वापसीवर थेट भाष्य न करता, महापालिका प्रशासनाने यासंदर्भात खुलासा केला आहे. मोठ्या प्रमाणावर जुनी, दुर्मिळ झाडे तोडली जात असल्याच्या माहीतीत काही तथ्य नाही. या उलट नदी काठच्या बाधित होणार्‍या वृक्षांपैकी ३ हजार १४२ वृक्ष न काढता त्यांचे जतन केले जाणार आहे. तर, नदी पुनरुज्जीवनाचे काम करताना जी वृक्ष काढणे अत्यावश्यक आहे, त्यांच्या बदल्यात ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्ष लावले जाणार आहेत. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहणार्‍या नदीच्या दोन्ही काठांवर हरीतपटा निर्माण होण्यास मदत होणार आहे असा दावा प्रशासनाने केला आहे.

 

बाधित होणार्‍या वृक्षांपैकी जी वृक्ष काढली जाणार आहेत, त्यामध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा अजिबात समावेश नाही. बाधित होणार्‍या वृक्षांमध्ये सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरीबाभूळ, विलायती चिंच अशा झाडांचे प्रमाण हे जास्त आहे. संगमवाडी ते बंडगार्डन या टप्प्याचे काम करीत असताना बाधित होणार्‍या एकूण वृक्षांपैकी १ हजार ५३८ झाडे संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे. त्यापैकी बाभूळ ४४१, सुबाभूळ ८०४ आणि विलायती बाभूळ/विलायती किकर ४८९ अशी सुमारे १ हजार ५३४ झाडांचा समावेश असल्याचे प्रकल्प अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.

 

वृक्ष लागवड व संगोपनासाठी भरीव कार्य करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज सकाळी बंडगार्डन येथे सुरू असलेल्या नदी काठ सुधार प्रकल्पाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी पर्यावरण प्रेमी आणि महापालिकेचे अधिकारी देखिल उपस्थित होते. यावेळी  महापालिकेच्या अधिकार्‍यांनी प्रकल्पाची माहीती देतानाच जी झाडे काढून टाकण्यात येणार आहेत, तसेच ज्या झाडांचे पुर्नरोपण करण्यात येणार आहे, त्याचीही माहीती शिंदे यांना यावेळी देण्यात आली. शिंदे यांनी देखिल काही समज गैरसमज असतील ते चर्चेतून दूर करणे शक्य असल्याचे यावेळी सांगितल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

 

हे देखील वाचा :

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रकरणात शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का

Pune PMC water Supply | गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरववठा बंद राहणार

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : हिंजवडी पोलिस स्टेशन – चांदणी चौकाच्या अलिकडे जबरी चोर्‍या करणार्‍यांचा पर्दाफाश, 6 गुन्हयांची उकल

 

Related Posts