IMPIMP

Pune News | पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानीपोटी 3.67 कोटींच्या अनुदानाची मागणी

by nagesh
Pune News | Demand for subsidy of 3.67 crores for heavy rain damage in Pune district

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | जून आणि जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाकडून तीन कोटी ६७ लाख रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा अहवाल ११ ऑगस्ट २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार वाढीव दराच्या फरकाच्या रकमेसह पाठविण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना अतिरिक्त मदत मिळणार आहे. (Pune News)

 

घरांच्या नुकसानीपोटी एक कोटी ३५ लाख ४४ हजार ६००, मृत पशुधनासाठी ७४ लाख ४२ हजार, शेतपीक आणि फळपिकाच्या नुकसानीपोटी एक कोटी ४५ लाख ७८ हजार, तर मृत आणि जखमी नागरिकांना द्यायच्या नुकसानीपोटी १२ लाख २५ हजार ४०० असा एकूण तीन कोटी ६७ लाख ९० हजार रुपयांचा अहवाल राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. हा अहवाल मान्य होऊन निधी प्राप्त होताच नुकसानग्रस्तांना निधीचे वाटप केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (Pune Collector Office) सांगण्यात आले. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या आधी तयार केलेल्या अहवालानुसार पूर्णत: आणि अंशत: पक्क्या व कच्च्या घरांच्या नुकसानीपोटी २९ लाख ९६ हजार ७०० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये ९० लाख ३१ हजार ९०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मृत पशुधनासाठी यापूर्वी ५७ लाख २९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये १७ लाख १३ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी घरे, गोठे, मृत पशुधन, मृत आणि जखमी नागरिक अशा एकूण नुकसानीपोटी दोन कोटी ५७ लाख ६५ हजार २८५ रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये एक कोटी सात लाख ६४ हजार ९०० रुपयांची वाढ करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

 

नुकसानीचा आढावा
जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पक्की, कच्ची घरे आणि झोडपड्या अशा ४७९ घरांचे, १६ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
पशुधनामध्ये मोठी गुरे १३०, लहान ५८, इतर ७७ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
शेतीपीक आणि फळपिक मिळून जिल्ह्यातील २०६८.८६ हेक्टरचे नुकसान झाले आहे,
तर १६.१५ हेक्टरवरील शेतजमीन वाहून गेली आहे.
अतिवृष्टीमुळे तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

 

Web Title :- Pune News | Demand for subsidy of 3.67 crores for heavy rain damage in Pune district

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजारांची लाच मागणारा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्टल व 11 काडतुसे जप्त

Garlic Health Benefits | ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याचे काम करतो लसून, जाणून घ्या तो खाण्याचे 5 फायदे

 

Related Posts