IMPIMP

Pune News | संपूर्ण राज्यात हुडहुडी; पुण्यात हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद

by sachinsitapure
Minimum Temperature

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | उत्तरेकडील थंड वार्‍यांचा जोर वाढल्याने राज्यात थंडीची लाट आली असून अनेक शहरांमधील किमान तापमान (Minimum Temperature) १० अंशांच्या खाली गेले आहे. पुणे शहरात बुधवारी पहाटे किमान तापमान ९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. या हंगामात प्रथमच सिंगल डिजिटमध्ये आले आहे. (Pune News)

मंगळवारी रात्रीपासून थंडीचा कडाका वाढला होता. आज पहाटेपासून हवेत खूप गारठा जाणवत होता. विदर्भात अवकाळी पाऊस तर पश्चिम महाराष्ट्र थंडीचा कडाका अशी स्थिती सध्या राज्यात दिसत आहे.

उत्तर भारतामध्ये किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून उत्तर प्रदेशातील मेरठ येथे निचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविले गेले आहे.

शहरातील किमान तापमान
एनडीए – ८.२
लोणी काळभोर – ८.७
शिवाजीनगर – ९.७
पाषाण -१०.१
दौंड – १०.९
तळेगाव – ११.१
हडपसर – १२.८
कोरेगाव पार्क – १४.४

Related Posts