IMPIMP

Pune News | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या चार नवीन व्हिजन सेंटरचे उद्घाटन

by nagesh
Pune News | HV for eye care. Inauguration of four new vision centers of Desai Eye Hospital

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) द्वारा संचालित एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या चार नवीन व्हिजन सेंटरचे उद्घाटन येरवडा, पिंपळे सौदागर, भोर आणि राजगुरुनगर येथे आज पीबीएमए व एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया, सीईओ डॉ. जी. व्ही. राव हे उपस्थित होते. (Pune News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यापूर्वी एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे २७ व्हिजन सेंटर महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत होती. ही संख्या आता ३१ वर पोहचली आहे. नवीन चार सेंटरच्या उभारणीस एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाला INGO SEVA Foundation आणि CBM India या संस्थांची मोलाची मदत लाभली आहे.

 

सदर केंद्रांचे उद्घाटन करताना श्री. राजेश शहा म्हणाले, या प्राथमिक नेत्र तपासणी सेवा सुविधांसह आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत नेत्रसेवा मूलभूत सुविधा पोहोचवत आहोत. आमची व्हिजन सेंटर दुर्गम भागातील लोकांच्या नेत्र तपासणीसाठी प्रथम केंद्राची भूमिका पार पाडतील. अशा सुविधा न पोहोचलेल्या लोकांपर्यंत पोहोचवल्याने टाळता येणारे अंधत्व दूर करणे शक्य होईल. समाजात सर्व सामान्यांसाठी डोळ्यांची निगा राखण्याची सेवा पुरविण्यासाठी, विशेषत: नेत्र रुग्णालय उपलब्ध नसलेल्या भागात, व्हिजन सेंटर्सना महत्त्व प्राप्त होते. लोकांनी या सुसज्ज सुविधेचा वापर करण्याचे आवाहन शहा यांनी केले. (Pune News)

 

ही सर्व व्हिजन सेंटर्स एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालया मार्फत पुरविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहेत आणि ती कुशल नेत्रसेवा तज्ञ् कर्मचार्‍यांकडून चालवले जातात. तसेच ती टेलीओफ्थाल्मोलॉजीद्वारे बेस हॉस्पिटलशी जोडलेले आहेत.

 

पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे (पीबीएमए) एचव्ही देसाई नेत्र रुग्णालय हे देशातील एक अग्रगण्य,
दर्जेदार नेत्र रुग्णालय आहे. सन २००० मध्‍ये या रुग्णालयाची स्‍थापना करण्यात आली.
हे रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे रुग्णालय डोळ्यांची दर्जेदार काळजीसाठी भारतातील सर्वोच्च मानक असलेल्या “NABH” मान्यताप्राप्त रुग्णालय आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune News | HV for eye care. Inauguration of four new vision centers of Desai Eye Hospital

 

हे देखील वाचा :

Election Commission | मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता 18 वर्षे पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Nilesh Rane | ‘धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना शोभणारा नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका’, भाजप नेत्याची घणाघाती टीका

Vacancies In CAPFs | डिसेंबर 2023 पर्यंत सशस्त्र दलात भरली जाणार 84,405 रिकामी पदे, मोदी सरकारने दिली माहिती

 

Related Posts