IMPIMP

Nilesh Rane | ‘धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना शोभणारा नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका’, भाजप नेत्याची घणाघाती टीका

by nagesh
Nilesh Rane | bjp nilesh rane protest with supporters at ratnagiri hatavli toll naka

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन सामनाचे कार्यकारी संपादक (Saamana Executive Editor) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांची विशेष मुलाखत (Special Interview) घेतली. या मुलाखतीचे दोन भाग प्रसिद्ध झाले आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार (Rebel MLA), खासदार (MP) आणि भाजपवर (BJP) टीका केली. यावरुन भाजपच्या नेत्यांनी राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीवर टीका केली. याच मुलाखतीबाबत भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेली मुलाखत म्हणजे फुटलेला पेपर सोडवणे आहे, असे निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले. तसेच धनुष्यबाण चिन्ह (Dhanushya Ban Symbol) उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही. लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका, अशी बोचरी टीकाही राणे यांनी केली. ते एका वृत्तवाहीनीसोबत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, मी पाहिलेली मुलाखत स्क्रिप्टेड आहे. ही मुलाखत म्हणजे पेपर सोडवण्यासारखे. या मुलाखतीत संजय राऊतांनी पत्रकारितेच्या कौशल्यातून प्रश्न विचारले आणि या प्रश्नांची थेट उत्तरे उद्धव ठाकरे यांनी दिली असे काहीही नाही.

 

बाळासाहेबांच्या नावावर मजा मारली

शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना नियती कोणालाही सोडणार नाही.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) नावावर आयुष्यभर मजा मारली, असे निलेश राणे म्हणाले.
आता उद्धव ठाकरे शाखेपर्यंत आले आहेत. त्यांनी यापूर्वी शिवसेना भवन, मातोश्रीच्या खाली कधी पाहिले नाही.
शिवाजी पार्कच्या पलीकडे कधी ते सभा घेत नव्हते. या माणसाला आता शाखेत यावे लागत आहे. ही नियती आहे.
नियती कोणालाही सोडत नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर आयुष्यभर मजा केली.
पण आता बसं झालं मजा करण्याचा त्यांचा कोटा पूर्ण झाला, असे राणे म्हणाले.

 

धनुष्यबाण चिन्ह शोभणारे नाही

उद्धव ठाकरे त्यांच्या जगातून बाहेर येत नाहीत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा (Election Symbol) प्रश्न आता कोर्टात आहे.
त्यावर मी बोलणे योग्य नाही. पण धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही. ते स्वत:च म्हणत आहेत की सगळे बाण निघून गेले.
आत ते रिकामटेकडे धनुष्य घेऊन बसलेत. धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरेंना शोभत होते.
यांना लॉलिपॉप वगैरे असं काहीतरी देऊन टाका. ते शोभेल, असा टोमणा राणे यांनी मारला.

 

राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले

संजय राऊतांवर टीका करताना निलेश राणे म्हणाले, संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
ते आजारी आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) महाराष्ट्रात काही ठिकाणी जाऊन भाषण करत आहेत.
या भाषणात ते गेलेल्या माणसांना गद्दार म्हणत आहेत. लोकांना गद्दार म्हटल्यानंतर तुम्ही योद्धा होत नाही.
तुम्हाला सिद्ध करावं लागतं, अशा शब्दात राणेंनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : –  Nilesh Rane | bjp leader nilesh rane criticizes shivsena chief uddhav thackeray and sanjay raut on interview and bow and row logo

 

हे देखील वाचा :

Vacancies In CAPFs | डिसेंबर 2023 पर्यंत सशस्त्र दलात भरली जाणार 84,405 रिकामी पदे, मोदी सरकारने दिली माहिती

Gold Price Today | चांदी 1,200 रुपयांनी महागली, सोने सुद्धा वाढून 51 हजारच्या जवळ, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा दर ?

Cholesterol Lowering Drinks | ‘या’ 4 नॅचरल ड्रिंक्सच्या मदतीने कमी होईल कोलेस्ट्रॉल, रोज प्यायची सवय करा

 

Related Posts