IMPIMP

Pune News | नववे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन मंचर येथे होणार 9 ऑगस्टला; ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांना, तर ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ कवी शिवानुज यांना जाहीर

by nagesh
Pune News | Ninth Student Teacher Literature Conference to be held at Manchar on 9th August Dr. Babasaheb Ambedkar Pragyawant Puraskar Pvt. Dr. Gautam Bengale while 'Bandhuta Shabdakranti Puraskar announced to poet Shivanuj

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune News | राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिदिनी’ 9 ऑगस्ट रोजी नववे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन मंचर येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय संचालक प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’, तर गुजरात येथील प्रसिद्ध कवी शिवानुज यांना ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. (Pune News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. माधवी खरात यांच्या हस्ते होईल. यावेळी स्वागताध्यक्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ कवी शंकर आथरे यांच्या ‘काव्यांचल’ या पुस्तकाचे प्रकाशन होईल. (Pune News)

 

दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांच्या अध्यक्षतेखाली बंधुता शब्दक्रांती काव्यसंमेलन होईल.
त्यामध्ये नारायण खेडेकर (औरंगाबाद), रवींद्र यशवंतराव (मुरबाड), धनंजय गव्हाले (सिल्लोड), मधुश्री ओव्हाळ (पुणे),
विजय जाधव (राजगुरूनगर), ज्ञानेश्वर शिंदे (कोपरगाव), विलास नवसागरे (औरंगाबाद), आरती कोरडकर (अहमदनगर),
सचिन चव्हाण (पाथर्डी), सचिन शिंदे (नेरळ) आणि विद्या अटक (पुणे) यांचा सहभाग राहील.
यावेळी प्रा. चंद्रकांत वानखेडे यांची विशेष उपस्थिती राहील.

 

समारोप समारंभात प्रसिद्ध जलतज्ज्ञ अनिल पाटील यांच्या हस्ते काही शिक्षकांना बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
त्यामध्ये प्रा. डॉ. बंडोपंत कांबळे (औंध), प्रा. व्ही. बी. फसाले (मंचर), प्रा. एस. टी. पोकळे (मंचर), प्रा. के. बी. एरंडे (मंचर),
अंबादास रोडे (मुळशी), प्रीती जगताप (चंद्रपूर), संदीप राठोड (निघोज), चंदन तरवडे (कोपरगाव),
विद्या गायकवाड (अहमदनगर) आणि महेश भोर (मंचर) यांचा समावेश आहे.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब गार्डी आणि परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रा. प्रशांत रोकडे यांनी पुढाकार घेतला आहे.

 

Web Title :- Pune News | Ninth Student Teacher Literature Conference to be held at Manchar on 9th August Dr. Babasaheb Ambedkar Pragyawant Puraskar Pvt. Dr. Gautam Bengale while ‘Bandhuta Shabdakranti Puraskar announced to poet Shivanuj

 

हे देखील वाचा :

Fibroid Removed From Uterus | 38 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून निघाला भोपळ्याच्या आकाराचा 5.6 KG वजनाचा फायब्रॉइड; खराडीच्या मदरहूड हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

Palak Benefits | पुरुषांची ‘ही’ समस्या दूर करते पालक, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत आणि 7 जबरदस्त फायदे

Pune Crime | सराईत वाहन चोराला गुन्हे शाखेकडून अटक, 9 दुचाकी जप्त

 

Related Posts