IMPIMP

Pune News | दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन; ३६ जिल्ह्यांमधून २२१५ दिव्यांग खेळाडू सहभागी होणार

by nagesh
Pune News | Organizing state level sports competitions for boys and girls with disabilities; 2215 disabled athletes from 36 districts will participate

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune News | महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग दिव्यांग कल्याण आयुक्तालय व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला आणि मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा मैदान महाळुंगे बालेवाडी येथे दि. १४ ते १६ फेबु्रवारी २०२३ या तीन दिवसांमध्ये होणार आहेत. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून २२१५ मूकबधिर, मतिमंद, आष्टी व्यंग, अंध विद्यार्थी सहभागी होणार आहे. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या स्पर्धेबाबत पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना श्री समर्थ व्यायाम मंडळ, इंदापूरचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे निमंत्रक प्रदीप गारटकर आणि दिव्यांग कल्याण उपाायुक्त संजय कदम यांनी सांगितले की, दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत असतात. २० वर्षांनंतर पुणे जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. पुणे जिल्ह्यासह मुंबई शहर, पालघर, रत्नागिरी, रायगड, बीड, जळगाव, जालना, नागपूर, अहमदनगर, सांगली, हिंगोली, यवतमाळ, अकोल, वर्धा, कोल्हापूर, लातूर, नाशिक, सिंधदूर्ग, अमरावती, सातारा, उस्मानाबाद, चंद्रपूर, सोलापूर, भंडारा, परभणी, ठाणे, नंदूरबार, धुळे, बुलढाणा, गोंदिया, वाशिम, नांदेड, औरंगाबाद आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधून दिव्यांग खेळाडू सहभागी होणार आहे. (Pune News)

 

यावेळी समाज कल्याण पुणे प्रादेशिक उपायुक्त श्री. बी.ए. सोळंकी, समाज कल्याण पुणेचे अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, दिव्यांग कल्याण उपायुक्त संजय कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

 

स्पर्धेमध्ये १५० क्रिडाप्रकार यांचा समावेश असून ८ वर्ष वयोगट हा सर्वात लहान खेळाडू तर, २५ वर्षाखालील वयोगट हा सर्वात मोठा वयोगट सहभागी होणार आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा मैदान महाळुंगे बालेवाडी येथे होणार्‍या या स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स्- धावणे, लांब उडी, गोळा फेक, व्हिलचेअर बसून गोळा फेक, बादलीत बॉल टाकणे, जलतरण (फ्री स्टाईल), पासिंग द बॉल, बुद्धीबळ असे वैयक्तिक क्रिडा स्पर्धा होणार आहे. वैयक्तिक क्रिडा स्पर्धा ८ ते १२, १२ ते १६, १७ ते २१, २२ ते २५ या वयोगटात होणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्पर्धेत प्रदशर्निय क्रिकेट सामना १५ फेब्रुवारी रोजी पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर होणार आहे. दिव्यांग खेळाडू, शेवते संघटना, रोटरी क्लब आणि डिकाई यांच्या मदतीने या सामन्याचे आयोजन होणार आहे. या सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहीत पवार उपस्थित राहणार आहेत.

 

या संपूर्ण स्पर्धेला पुणे महानगर पालिका, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका, समाज कल्याण विभाग,
जिल्हा परिषद, क्रिडा विभाग- बालेवाडी यांनी सहकार्य केले आहे.

 

स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून व साठेआठशे कर्मचारी या स्पर्धेसाठी काम करत आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मागील एक महिन्यापासून सामाजिक न्याय विभाग दिव्यांग कल्याण आयुक्तालय,
जिल्हा समाज कल्याण कार्यालय व विविध समिती यांचे सदस्य असे सुमारे ४०० कर्मचारी आणि कार्यकर्ते
अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

 

स्पर्धेचे उद्धघाटन राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि सामारोप विरोधी पक्षनेते श्री. अजितदादा पवार आणि
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडू व संघांना मेडल्स्,
शासनाचे प्रशस्तीपत्रक, करंडक देण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या दिव्यांग मुलांच्या मनोरंजनासाठी विशेष संगीत रजनी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईतील उडान एन्टरटेमेंट संस्थेच्या अंध मुलांचा आर्केस्ट्रा या संगीत रजनी कार्यक्रमात सादर होणार आहे.
तसेच वेगवेगळ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.

 

 

Web Title :- Pune News | Organizing state level sports competitions for boys and girls with disabilities; 2215 disabled athletes from 36 districts will participate

 

हे देखील वाचा :

IND vs AUS 1st Test | टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; एक डाव अन 132 धावांनी मिळवला विजय

Nashik Crime News | 21 वर्षांनी गर्भवती राहणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

Mumbai Accident News | चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

 

Related Posts