IMPIMP

Nashik Crime News | 21 वर्षांनी गर्भवती राहणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

by nagesh
Nashik Crime News | pregnant woman death with twins in nashik

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये घरात भोवळ येऊन पडल्याने गर्भवतीसह जुळ्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि महिला तब्बल 21 वर्षांनी गर्भवती राहिली होती त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र या परिवाराचा आनंद काही जास्त वेळ टिकू शकला नाही. पाथर्डी फाटा येथील या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पूजा देवेंद्र मोराणकर असे मृत्युमुखी पडलेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. पाथर्डी फाटा परिसरात मोराणकर कुटुंब राहत असून, शुक्रवारी सकाळी पूजा आपल्या घरातील कामे करीत होत्या. घरातील कामे आवरण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली आणि घरातच कोसळल्या. या वेळी घरामध्ये वडील रमेश चिंतामण पाखले आणि बहीण होती. (Nashik Crime News)

 

पूजा जमिनीवर कोसळल्याचे पाहून वडिलांनी आणि बहिणीने पूजा यांना तातडीने पाथर्डी फाटा येथील
वक्रतुंड रुग्णालयात पूजा यांना दाखल करण्यासाठी गेले.
मात्र, जिना चढत असतानाच त्यांना पुन्हा भोवळ आली आणि त्या जागीच कोसळल्या.
यावेळी पूजा यांच्यासह त्यांच्या गर्भातील जुळ्या बाळांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे मोराणकर आणि पाखले कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Nashik Crime News | pregnant woman death with twins in nashik

 

हे देखील वाचा :

Jalna Crime News | मळणी यंत्रामध्ये महिलेची वेणी अडकल्यामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Accident News | चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Kolhapur Crime News | सतत होत असलेल्या भांडणाला वैतागून आरोपी मुलाचा आपल्या आईवडिलांवर प्राणघातक हल्ला; कोल्हापूरमधील घटना

 

Related Posts