IMPIMP

Pune News | देशातील 1200 सरपंच, अधिकार्‍यांची पिंपरी-चिंचवडला राष्ट्रीय कार्यशाळा

by nagesh
Pune News | Pimpri-Chinchwad National Workshop of 1200 Sarpanchs, Officers of the country

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune News | स्वच्छ व हरित ग्राम आणि जल समृद्ध गाव या संकल्पांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा पुण्यात होत आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने 22 ते 24 सप्टेंबर रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि देशभरातील असे एकूण बाराशे सरंपच, अधिकार्‍यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. (Pune News )

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंचायती  राज्यमंत्री कपिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार, आमदारसह केंद्र व राज्य शासनातील विविध विभागाचे वरिष्ठ विभागातील अधिकारी सहभागी होणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 20 सरंपच आणि देशातील प्रत्येक राज्यातील 20 सरपंच कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. या सर्व सरपंचामध्ये समुह संवादाच्या कार्यक्रमाचा देखील समावेश करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या 9 संकल्पनापैकी दोन संकल्पनावर राष्ट्रीय स्तरावर कार्यशाळा महाराष्ट्र शासनामार्फत होत आहे. पहिल्या दोन दिवशी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाची नवी संकेतस्थळ, मोबाइल अ‍ॅप, व्याख्याने, पाच पॅनेल चर्चा होणार आहे. त्यानंतर राज्यातील व अन्य राज्याचे सरपंच त्यांच्या गावची यथोगाथा कथन करणार आहेत आणि त्यावर चर्चा होणार आहे. समारोप महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या कार्यक्रमाने होणार आहे. शेवटच्या दिवशी पुण्यातील मावळ, मुळशी, सातर्‍यातील वाई आणि महाबळेश्वर तसेच अहमदनगर येथील काही गावांना हे सरपंच भेटी देणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.

 

Web Title :-  Pune News | Pimpri-Chinchwad National Workshop of 1200 Sarpanchs, Officers of the country

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | वेदांता-फॉक्सकॉन वरुन राजकारण तापलं, मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; उद्या दिल्लीत घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट

Pimpri Chinchwad Municipal Corporation | सात दिवसानंतरही पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त; स्मिता झगडे यांची नियुक्ती कोणी रोखली?

Pune Grampanchayat Election Results 2022 | ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचाच बोलबाला; 61 पैकी 46 ग्रामपंयाती ताब्यात

Fenugreek Benefits | भाजी एक, फायदे अनेक ! शुगर आणि ब्लड प्रेशर सारखे 11 धोकादायक आजार जातील पळून

 

Related Posts