IMPIMP

Pune News | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या NEMS पूर्व प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

by nagesh
Pune News | The annual gathering of NEMS Pre-Primary Section of Deccan Education Society concluded with enthusiasm

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune News | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (DES School) एन्.ई.एम्.एस्. पूर्व प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेह संमेलन टिळक स्मारक मंदिर येथे नुकतेच उत्साहात संपन्न झाले. निसर्ग हा विषय असलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी प्राणी, पक्षी, झाडं, पाणी यावर आधारित गाण्यांवर नृत्य व नाट्य यांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळा आणि निसर्गाचे रक्षण करा असा संदेश दिला. तसेच पाणी वाया न घालवता पाणीबचत करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व बालमानस तज्ञ तनुजा महाजन यांनी पालकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित संस्थेच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, शाला समिती अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, सदस्या ॲड. राजश्री ठकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेतील शिक्षिका प्रतिभा गुरव यांनी सूत्रसंचालन तर अंजली वालगुडे यांनी आभार प्रदर्शन केले. मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. (Pune News)

 

 

Web Title :- Pune News | The annual gathering of NEMS Pre-Primary Section of Deccan Education Society concluded with enthusiasm

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘याचा हिशोब 2024 मध्ये केला जाईल’; संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

Shreyas Iyer | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रेयसचा बोलबाला; सूर्यकुमारलाही टाकले मागे

Pune Crime | ‘माझ्यासोबत रिलेशन ठेव अन्यथा…’ भर रस्त्यात धमकी देत तरुणीचा विनयभंग; पुण्यातील घटना

Pune MPSC News | महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर केवळ 3 सदस्य असल्याने 5000 उमेदवारांच्या मुलाखती टांगणीला

 

Related Posts