IMPIMP

Shreyas Iyer | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रेयसचा बोलबाला; सूर्यकुमारलाही टाकले मागे

by nagesh
Shreyas Iyer | year ender shreyas iyer top international runscorer in 2022 surpasses suryakumar yadav

सरकारसत्ता ऑनलाईन  – Shreyas Iyer | भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो भारतासाठी यावर्षी सर्वाधिक
आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने टी-20 इंटरनॅशनलचा नंबर वन बॅट्समन सूर्यकुमार यादवलादेखील मागे टाकले आहे. सूर्याने या
वर्षात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून 1424 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1164 धावा आणि
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 260 धावा केल्या आहेत. (Shreyas Iyer)

 

श्रेयस अय्यरने यावर्षी सूर्यकुमारला मागे टाकत या वर्षातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा आकडा पार केला आहे. या खेळीपर्यंत त्याने 2022 मध्ये सर्वाधिक 1571 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या धावांमध्ये अय्यरने कसोटीत 388 धावा, एकदिवसीय सामन्यात 724 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 463 धावा केल्या आहेत. (Shreyas Iyer)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वन-डे मध्ये अय्यरची खास कामगिरी

अय्यरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये यंदादेखील 1500 धावांचा आकडा पार केला आहे. अय्यर वनडेमध्ये सर्वात जलद 1500 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 35 डावात हा आकडा पार केला आहे. याअगोदर हा विक्रम केएल राहुलच्या नावावर होता. त्याने एकदिवसीय सामन्यांच्या 36 डावांमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या होत्या. अय्यरने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 48.30 च्या सरासरीने एकूण 1537 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 49 सामन्यांत 30.67 च्या सरासरीने 1043 धावा केल्या आहेत.

 

Web Title :- Shreyas Iyer | year ender shreyas iyer top international runscorer in 2022 surpasses suryakumar yadav

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘माझ्यासोबत रिलेशन ठेव अन्यथा…’ भर रस्त्यात धमकी देत तरुणीचा विनयभंग; पुण्यातील घटना

Pune Bhor News | विजेचा शॉक लागून 4 जणांचा मृत्यू; भोर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Pune MPSC News | महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर केवळ 3 सदस्य असल्याने 5000 उमेदवारांच्या मुलाखती टांगणीला

Jitendra Awhad | ‘हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय?’; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर घणाघात

 

Related Posts