IMPIMP

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – सहा महिन्यात रक्कम दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त व्यक्तीला दोघांनी फसवल्याची घटना (Pune Pimpri Crime) घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ रामभाऊ झरेकर Ambernath Rambhau Zarekar (वय 71, रा. माळवाडी मार्ग, गाडीतळ रोड, हडपसर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) तक्रार दिली आहे. पोलीस आरोपी पिता – पुत्राचा (Pune Pimpri Crime) शोध घेत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणी राजेंद्र दुर्गा पवार Rajendra Durga Pawar (वय 53, रा. बावधान, पुणे), वृषभ राजेंद्र पवार Vrishab Rajendra Pawar (वय 27) यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात आयपीसी (IPC) 420, 406 आणि 34 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र पवार यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे.
तर वृषभ पवार यांचा ‘पवार कन्सलटंसी’ (Pawar Consultancy) नावाचा व्यवसाय असून त्याचे बावधन
या ठिकाणी कार्यालय आहे. आरोपी राजेंद्र पवार याने आपल्याकडे पैसे गुंतवल्यास सहा महिन्यात दुप्पट करुन
मिळतील असे सांगितले. फिर्यादी झरेकर यांनी राजेंद्र यांच्यावर विश्वास ठेवून सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेले 33 लाख रुपये मे 2020 मध्ये वृषभ यांच्या ‘पवार कन्सलटंसी’च्या बँक खात्यावर जमा केले.
मुदत संपल्यानंतर देखील आरोपींनी फिर्यादी यांना परताव्यासह 66 लाख रुपये न देता आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खारगे (API Kharage) करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Cheating of 33 lacs with senior retired officer bavdhan area case

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात ‘तू तू मै मै’

Pune Pimpri Crime | बिल्डर प्रतीक अगरवाल यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर, तक्रारदाराविरुद्ध तक्रार दाखल करणार – अ‍ॅड. अभिषेक उपाध्ये

Indonesia Earthquake | इंडोनेशियामध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 46 जणांचा मृत्यू, 700 जण जखमी

PM Narendra Modi | ‘काँग्रेसवाले मला नीच, नाल्यातील किडा, मृत्यूचा व्यापारी म्हणतात, पण, मी…’ – नरेंद्र मोदी

 

Related Posts