IMPIMP

Pune Pimpri Crime | बिल्डर प्रतीक अगरवाल यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर, तक्रारदाराविरुद्ध तक्रार दाखल करणार – अ‍ॅड. अभिषेक उपाध्ये

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | मुळशी तालुक्यातील नेरेगाव येथे द व्हिलेज रेसिडेन्सी येथे 35 जणांना घर देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून घरांची किंमत वसूल करुन फरार झालेला बांधकाम व्यावसायिक (Builder) प्रतीक अगरवाल (Pratik Agarwal) याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुंडा विरोधी पथकाने नागपूर येथून अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Crime) प्रतिक अगरवाल यांच्यावर करण्यात आलेली कारवाई कायदेशीर नसून तक्रार करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे अगरवाल याचे वकील अभिषेक उपाध्ये (Adv. Abhishek Upadhyay) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रतिक अगरवाल यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार खोटी असून ती कायदेशीर नाही. कारण प्रकल्प 70 टक्के पूर्ण झाला असून या प्रकरणात तक्रारदार यांनी RERA कडे तक्रार करण्याऐवजी पोलिसांकडे तक्रार केली. प्रतिक अग्रवाल यांना मुद्दाम त्रास देण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी तक्रारदार यांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. आम्ही तक्रारदार यांच्याविरुद्ध तक्रार करणार असल्याचे अ‍ॅड. अभिषेक उपाध्ये यांनी सांगितले.

 

काय आहे प्रकरण?

आरोपी प्रतीक ओमप्रकाश अगरवाल (रा. बाणेर, पुणे) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) मोफा अंतर्गत (MOFA Act) गुन्हा (FIR) दाखल आहे. याबाबत मनमिंदरसिंग तिर्थसिंग आनंद Manmindersingh Tirthasingh Anand (वय – 55, रा. औंध, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. अगरवालने अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर तो पोलिसांच्या स्वाधीन न होता गेली दोन वर्षे फरार होता. अखेर त्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Pimpri Crime) नागपूर येथून अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

मुळशी तालुक्यातील द व्हिलेज रेसिडेन्सी, नेरेगाव, (The Village Residency, Nere Gaon)
या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक प्रतिक अगरवाल, किरण कुंभारकर Kiran Kumbharkar (रा. हिंजवडी),
विनय बोरीकर Vinay Borikar (रा. हिंजवडी) यांनी फिर्यादी मनमिंदरसिंग आनंद आणि इतर 34 सदनिका धारकांना मार्च 2018 रोजी खरेदीखत देऊन 4 कोटी 14 लाख 27 हजार 491 रुपये उकळले.
त्यानंतर त्यांची फसवणूक (Fraud) करुन त्यांना सदनिकांचा ताबा न देता फरार झाले.
याबाबत तिघांच्या विरोधात हिंडवडी पोलीस ठाण्यात आयपीसी (IPC) 406, 420, 34 आणि मोफा
कायद्यांतर्गत (MOFA) कलम 03 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून फरार झालेला प्रतीक अगरवाल रांची झारखंड आणि हैद्राबाद
या ठिकाणी आपले बस्तान बसवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तो पुणे नागपूर आणि रांची असा रेल्वेने प्रवास करत असताना, रेल्वे सुरक्षा बल (Railway Security Force)
आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला नागपूर रेल्वे स्थानकात हतीया ते पुणे एस. एफ. एक्सप्रेसमधून
(S. F. Express) ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले
आहे. त्याला न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Action against builder Prateek Agarwal illegal, will file a complaint against the complainant – Adv. Abhishek Upadhyay

 

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | प्रेमसंबंधाची माहिती पतीला सांगण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार, पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

Indonesia Earthquake | इंडोनेशियामध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 46 जणांचा मृत्यू, 700 जण जखमी

IND vs NZ 3rd T20 | सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन वैद्यकीय कारणामुळे बाहेर

 

 

Related Posts