IMPIMP

Pune Pimpri Crime | ‘हात पाय तोडून ‘मुळशी पॅटर्न’ करेन’, धमकी देऊन खंडणीची मागणी; हिंजवडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | 25 lakh extortion demand from govt contractor, FIR against 7; Incidents in Pimpri Chinchwad area

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | मोबाईल कंपनीच्या इंटरनेट केबल टाकण्याचे आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्यांना प्रति महिना 20 हजार रुपये हप्ता द्या अन्यथा तुमचे हात पाय तोडून ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) करु, अशी धमकी (Threat) दिल्याचा प्रकार समोर (Pune Pimpri Crime) आला आहे. ही घटना डिसेंबर 2021 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत फेज-2 कॉड्रोन आयटी पार्क (Caudron IT Park) मुळशी येथे घडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी रोहीत संजय शिवले Rohit Sanjay Shivle (वय-36 रा. सोमवार पेठ पोलीस लाईन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) मंगळवारी (दि.13) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश ओझरकर Ganesh Ozarkar (रा. माण ता. मुळशी) याच्या विरुद्ध आयपीसी 387, 506, 504 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची एअरटेल कंपनीच्या (Airtel Company) वतीने इंटरनेट केबल पुरवण्याचे व दुरुस्तीचे काम पाहतात.
त्यांच्या कंपनीच्या केबल जोडणीचे काम करणारे करण शिंदे (Karan Shinde) तसेच इतर कामगारांना जर येथे काम करायचे असेल तर प्रति महिना 20 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे आरोपीने सांगितले.
तसेच हप्ता दिला नाही तर मी पुन्हा केबल तर तोडीनच पण तुमचे हात-पाय मी तोडेन असे म्हणत पुन्हा येथे आला
तर तुमचा ‘मुळशी पॅटर्न’ करीन अशी धमकी देत खंडणीची (Extortion) मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे (PSI Mahendra Gadve) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Mulshi Pattern Extortion Case Hinjewadi Police Station Limits

 

हे देखील वाचा :

Irrigation Department | राज्यातील धरणांच्या जलाशयांच्या परिसरात 200 मीटर अंतरात पक्क्या बांधकामांना बंदी – पाटबंधारे विभाग

Pune Crime | पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाकडून हॉटेलमध्ये गोळीबार

Pune Crime | वारजे माळवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 21 जण ताब्यात

 

Related Posts