IMPIMP

Pune Pimpri Crime | मटणाच्या सुपात भात आल्याने खानावळीतील वेटरचा खून; पिंपरी-चिंचवडमधील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ कारणावरुन खानावळीत काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा खून (Youth Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे मटण खानावळीत (Mutton Khanawal) ही घटना घडली. मटणाच्या सूपमध्ये भात आल्याच्या कारणावरुन दोघांनी वेटरला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (Beating) केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन वेटरचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपी (Pune Pimpri Crime) फरार झाले असून सांगवी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंगेश संजय पोस्ते Mangesh Sanjay Poste (वय-19) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. अजित मुठकुळे Ajit Muthkule (वय-32), सचिन भवर Sachin Bhawar (वय-22) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विजयराज वाघिरे (Vijayraj Waghire) आणि त्याच्या साथीदारावर सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल महादू रजाळे यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील मटण खानावळीत आरोपी हे नेहमी जेवण
करण्यासाठी येतात. मंगळवारी मटणाच्या सुपामध्ये भात आला. यावरुन आरोपींनी वेटर अजित मुठकुळे,
सचिन भवर आणि मयत मंगेश यांना शिविगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
हॉटेलची सर्व्हिस, जेवण योग्य नसल्याचे म्हणत आरोपींनी तिघांना बेदम मारहाण केली.
यात मंगेश याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

 

हे देखील वाचा :

Ananya Pandey | अनन्या पांडे न्यूयॉर्कमध्ये करतेयं धमाल, शेअर केले फोटो

8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगाची चर्चा; केंद्रीय कर्मचाऱ्यांची 44 टक्के पगार वाढीची मागणी

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

 

Related Posts