IMPIMP

Pune Pimpri Fire News | चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू (Video)

by sachinsitapure
Pune Fire

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Fire News | पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथे मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला. ललित अर्जुन चौधरी (वय-21) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय-23) असे मृत्यू झालेल्या भावांची नावे आहे. आधी लाकडाच्या वखारीला आग लागली, त्यानंतर त्याच्या झळा शेजारी असलेल्या विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोर मेकिंग कंपनी (Vinayak Aluminum Profile Door Making Company) असल्याने भीषण आग लागली. आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या दोघांचा झोपेतच मृत्यू झाला. प्राधिकरण ०१ फायर टेंडर वाहन, चिखली ०१ फायर टेंडर वाहन, पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र ०२ फायर टेंडर व थेरगाव ०१ फायर टेंडर वाहनांनी ही आग विझवली. (Pune Pimpri Fire News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

रामेश्वरी निलेश लावंड यांनी रात्री ०२:२४ मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी येथिल अग्निशमन नियंत्रण कक्षास येथे फोन करून कळविले की जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड या ठिकाणी पत्राच्या शेडला आग लागली आहे, सदर वर्दी प्राप्त होताच प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र अग्निशमन वाहनाबरोबर पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र ०२ व चिखली उपग्निशमन केंद्र व थेरगाव उप अग्निशमन केंद्र प्रत्येकी एक अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच प्रथम प्राधिकरण उप अग्निशमन पथक घटनास्थळी पोहोचले, त्या पाठोपाठ पिंपरी अग्निशमन पथक, थेरगाव व चिखली उप अग्निशमन पथक घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी पत्राचे शेडच्या रांगेमधील दोन शेडला आग लागली होती. दोन्ही गोडाऊन पूर्णपणे पेटलेले होते, प्रथमदर्शी पाहणी केली असता माहिती मिळाली की, पहिले गोडाऊन मध्ये लाकडाची वखार आणि हँड सो मशीन्सला, एअर कॉम्प्रेसर, अन्य ज्वलनशील साहित्य व उपकरणे तासेच MH 14 DX 9701 स्विफ्ट गाडीने पेट घेतला होता. दुसऱ्या गोडाऊन मध्ये अल्युमिनियमच्या फ्रेम व दोन टू व्हीलर तसेच दोन व्यक्ती आगीच्या धुरामुळे (कार्बन डाय-ऑक्साइड तथा कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूमुळे) झोपेतच असताना त्या शेडमध्ये ऑक्सीजन वायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे बेशुद्ध होऊन पोटमाळ्यावर पडून राहिल्याने आगीच्या भक्षस्थानी पडल्याने मृत्युमुखी झाले असल्याचे आढळून आले.

फायर होज व होज रील होजच्या साह्याने पाण्याच्या लाईन द्वारे आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे विझविली. सदर परिसरातील लगतच्या अन्य निवासी इमारतीमधील सर्व रहिवासांना पोलिसांच्या मदतीने इमारती बाहेर सुरक्षित रित्या स्थलांतरित करण्यात आले. स्थानिक रहिवासी वर्गामार्फत प्राप्त माहितीनुसार गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीज मधील वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर हे त्याला लागून असल्यामुळे आग व धूर ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर शेड मध्ये गेला. शेडला एकच दरवाजा असल्यामुळे आत मध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड व कार्बन डाय-ऑक्साइड चा धूर झाला. तसेच त्या शेडमध्ये पोटमाळा वर अडकलेले दोन व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध पडले, व आगेच्या भक्षस्थानी सापडले. अग्निशमन पथके घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी शेडचे दरवाजा खोलून ठेवला होता, व बादलीच्या साह्याने पाणी मारून अग्निशमन कार्य करत होते.

प्रथमदर्शी अग्निशमन दलास आगीचे कारण आगीचे कारण समजू शकले नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ०४ अग्निशमन केंद्रातील एकूण ५ अग्निशमन वाहनांसह जवळपास ३५ ते ४० अग्निशमन जवानांनी आग वर्दी शर्तीने पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

Related Posts