IMPIMP

Pune PMC – Katraj Dog Park | नियोजित डॉग पार्कमुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या विस्तारीकरणाला अडथळा?

डॉग पार्कसाठी अन्यत्र जागा शोधावी - सर्वसामान्य नागरिकांची मागणी

by nagesh
Pune PMC – Katraj Dog Park | Rajiv Gandhi Zoological Park expansion hampered by planned dog park?

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune PMC – Katraj Dog Park | कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयालगत (Rajiv Gandhi Zoological Park Katraj Pune) नव्याने होणार्‍या उड्डाणपुलाखालील सुमारे साडेतीन एकर जागेवर महापालिका प्रशासनाने (Pune PMC Administration) पीपीपी तत्वावर डॉग पार्क करण्याचे नियोजन केले आहे. परंतू ही जागा प्राणी संग्रहालय म्हणून राखीव असून याठिकाणी जंगली प्राण्यांसाठी खंदक बांधण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उड्डाणपुलासाठी जागा सोडतानाच उड्डाणपुलांवरून जाणार्‍या वाहनांच्या ध्वनी प्रदूषण होउ नये, यासाठी साउंड बॅरिअरर्सचे काम देखिल करण्यात येणार आहे. डॉग पार्कसाठी प्राणी संग्रहालयासाठी बहुमुल्य जागा वापरू नये, असा विरोधी सूर स्थानिकांमधून उमटू लागला आहे. (Pune PMC – Katraj Dog Park)

महापालिका Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाने कात्रज येथील प्राणी संग्रहालयालगतच पीपीपी तत्वावर डॉग पार्क उभारण्याचे नियोजन केले आहे. प्राणी संग्रहालयाची ही जागा वंडरसिटी ते राजस सोसायटी चौकादरम्यानच्या उड्डाणपुलासाठी सोडण्यात आली आहे. ही जागा देताना केवळ या जागेत पुलासाठीचे तीन पिलर्स उभारण्यात येतील. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना पुलावरून जाणार्‍या अवजड वाहनांच्या रहदारीच्या आवाजाचा त्रास होउ नये, यासाठी एनएचआयच्यावतीने उड्डाणपुलावर साउंड बॅरिअर्स देखिल उभारण्यात येणार आहेत. यामुळे सध्याजरी ही जागा रिकामी असली तरी या जागेवर जंगली प्राण्यांसाठी खंदक तयार करण्याचे नियोजन यापुर्वीच प्राणी संग्रहालय प्रशासनाने केले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सध्याची परिस्थिती पाहाता प्राणी संग्रहालयाच्या विस्तारीकरणाला या ठिकाणी जागा शिल्लक नाही.
असे असताना तब्बल साडेतीन एकर जागा डॉग पार्कसाठी दिल्यास संग्रहालयाचे विस्तारीकरण कधीच शक्य होणार नाही.
त्यामुळे प्रशासनाने प्राणी संग्रहालयालगत डॉग पार्क करु नये.
डॉग पार्क केल्यास तेथे येणारी वर्दळ वाढणार असून बाहेर रस्त्यावर वाहनांचे देखिल पार्किंग होणार असल्याने वाहतुकीच्या समस्येत वाढ होईल.
यासाठी प्रशासनाने डॉग पार्कसाठी अन्य जागांचा विचार करावा, अशी मागणी सर्वसामान्य स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title : Pune PMC – Katraj Dog Park | Rajiv Gandhi Zoological Park expansion hampered by planned dog park?

Related Posts