IMPIMP

Pune PMC News | G 20 आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’साठी महापालिकेने कसली कंबर

by nagesh
Pune PMC News | Changes in the boundaries of the Pune Municipal Corporation! 'Expulsion' of Fursungi and Uruli Deva from the municipality limits, the government announced the revised limits of Pune municipality

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune PMC News | जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या जी-२० आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त स्वच्छ पुणे, सुंदर पुणे
संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांच्याकडून
सातत्याने आढावा घेतला जात आहे. विविध देशांचे शिष्टमंडळाचे प्रतिनिधी पुण्यातील एैतिहासिक, पर्यटन स्थळांनाही भेट देणार आहे. या ठिकाणांची
प्रकाश व्यवस्था, दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार शनिवार वाड्यातील (Shaniwar Wada) ध्वनी प्रकाश यंत्रणा कार्यान्वित झाली
आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जानेवारी महीन्यात पुण्यात जी -२० ही आंतरराष्ट्रीय परीषद पार पडत आहे. या परीषदेच्या निमित्ताने येथे येणार्‍या विविध देशांच्या प्रतिनिधींना पुण्याचे विद्रुपीकरण, अस्वच्छ असे चित्र दिसु नये केंद्र सरकारच्या (Central Government) अधिकार्यांकडून महापालिकेसह विविध विभागांच्या बैठका घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहे. यामध्ये प्रामुख्याने शहराचे सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचनांचा समावेश आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने (Pune PMC News) कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.

 

अनधिकृत जाहीरात फलक, फ्लेक्सवर कारवाई
शहरात उभारण्यात येणार्‍या अनधिकृत जाहीरात होर्डिंग, फ्लेक्सबाजी मुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. यावर आयुक्त विक्रम कुमार यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात अनधिकृत १ हजार ९३९ जाहीरात होर्डींग्ज असुन, त्यांना नोटीसा देण्यास सुरुवात झाली आहे. क्षेत्रीय कार्यालयामार्फत या नोटीस बजाविल्या जात असुन, सदर होर्डींग्ज काढून घ्यावेत अन्यथा परवानगी घेऊन नियमित करावेत असे या नोटीस मध्ये बजाविण्यात आले आहे. त्यासंदर्भातील कारवाईचा आढावा आयुक्तांकडून सातत्याने घेतला जात आहे.

 

ऐतिहासिक स्थळे, पर्यटन केंद्राच्या ठिकाणी कामे
शहरात येणार्‍या विविध देशातील प्रतिनिधींना पुण्यातील एैतिहासिक, शहर आणि शहराजवळील पर्यटन स्थळांच्या भेटी घडविल्या जाणार आहे.
यामुळे शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) आदी ठिकाणांचा यात समावेश आहे.
यापाश्वभुमीवर शहरातील एैतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या वास्तुंच्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था, तेथील स्वच्छता आणि सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्वच्छतागृहांसाठी दोन पातळीवर कामे देणार
शहरात सुमारे बाराशेच्या आसपास सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. या स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टीं चितेंचा विषय आहे.
या स्वच्छतागृहांच्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता हा देखील महत्वाचा प्रश्न नुकतेच केलेल्या पाहणीतून सुमोर आला आहे.
यादृष्टीने सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि देखभाल दुरुस्ती अशी दोन कामे करण्यासाठी स्वतंत्रपणे ठेकेदार
नियुक्त केले जाणार आहे. याची निविदा प्रक्रीया पार पडली आहे.
काम सुरु करण्याचे आदेशही लवकरच दिले जाणार आहेत.

 

Web Title :- Pune PMC News | On the occasion of the G 20 International Conference, Lots of effort did the Pune Municipal Corporation take for ‘Clean Pune, Beautiful Pune

 

हे देखील वाचा :

BMC Elections | BMC च्या प्रभागाच्या संख्येवरून आता पालिका आणि राज्य निवडणूक आयोग नोंदवणार जबाब; उच्च न्यायालयाचे याचिका सुनावणीवेळी आदेश

Shraddha Walkar Murder | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर; फाशीसाठी आवारात वकिलांचा राडा

Rahul Gandhi | मनसेने आमच्या सभेत गोंधळ घातला, तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ – काँग्रेस

 

Related Posts