IMPIMP

Pune Police MPDA Action | लोणी-काळभोर परिसरातील हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या महिलेवर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 41 वी स्थानबध्दतेची कारवाई

by sachinsitapure
Pune Police MPDA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MPDA Action | लोणी-काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni-Kalbhor Police Station) हद्दीत गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे करणाऱ्या महिलेविरुद्ध पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांची ही 41 वी कारवाई केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सरस्वती संतोष राठोड Saraswati Santosh Rathod (वय-36 रा. काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली जि. पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. आरोपी महिला ही अट्टल गुन्हेगार (Criminal) असून तीने तीच्या साथीदरांसह गावठी दारु तयार करणे, विक्री करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच तीच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपी सरस्वती राठोड हिच्या विरोधात मागील पाच वर्षात 4 गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता.
प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी सरस्वती राठोड हिला
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior PI Dattatraya Chavan)
व पी.सी.बी. गुन्हे शाखा (P.C.B. Crime Branch) वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे (Senior PI A.T. Khobare) यांनी केली. (Pune Police MPDA Action)

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 41 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Posts