IMPIMP

Pune Voter News | पुणे जिल्ह्यात 79 लाख 51 हजार 420 मतदार; मतदार संख्येत 74 हजार 470 ची वाढ

by nagesh
Pune Voter News | भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत १ जानेवारी २०२३ या

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Voter News | भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी गुरुवारी (५ जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये ७९ लाख ५१ हजार ४२० मतदार इतकी एकूण मतदारसंख्या असून यादीत ७४ हजार ४७० मतदारसंख्येची भर पडली आहे. (Pune Voter News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनानुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. (Pune Voter News)

 

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातील वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच सर्व पदनिर्देशित ठिकाणी ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

 

या अंतिम मतदार यादीमध्ये एकुण ७४ हजार ४७० इतक्या मतदारांची वाढ झालेली असून त्यात पुरुष मतदार
संख्या ३५ हजार ५९८ इतकी, महिला मतदार संख्या ३८ हजार ७२१ इतकी व तृतीयपंथी मतदार संख्या १५१ ने
वाढलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये २१ विधानसभा मतदार संघात एकूण ७९ लाख ५१ हजार ४२० इतके मतदार
समाविष्ट आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४१ लाख ६६ हजार २६५, महिला मतदारांची संख्या ३७ लाख ८४
हजार ६६० व तृतीय पंथी मतददारांची संख्या ४९५ इतकी आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अंतिम मतदार यादी पाहणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन दिलेली असल्याने नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे.
तसेच https://www.nvsp.in व https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने छायाचित्र नसलेली मतदार यादी उपलब्ध असून मतदारांचे नाव मतदार यादीत
समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले नाव अंतिम मतदार
यादी मध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी
केले आहे.

 

मतदार यादीत अद्यापही नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी https://www.nvsp.in या पोर्टलवर
ऑनलाईन पद्धतीने आपले नाव नोंदवावे किंवा नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म नं.६
भरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा, असेही डॉ. देशमुख यांनी कळवले आहे.

 

 

Web Title :- Pune Voter News | 79 lakh 51 thousand 420 voters in Pune district; Increase in the number of voters by 74 thousand 470

 

हे देखील वाचा :

Beed ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ व एजंट अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Chandrashekhar Bawankule | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा छगन भुजबळांवर घणाघात; म्हणाले…

Legislative Council Elections | बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध थोपटले दंड, विश्वासात न घेतल्याने उचललं टोकाचं पाऊल

 

Related Posts