IMPIMP

Legislative Council Elections | बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध थोपटले दंड, विश्वासात न घेतल्याने उचललं टोकाचं पाऊल

by nagesh
Legislative Council Elections | bachchu kadu prahar candidate against shinde group and bjp assembly council election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी (Legislative Council Elections) येत्या 30 जानेवारीला निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) नाराजी समोर आली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात (Legislative Council Elections) पाचही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याने आपण पाचही मतदारसंघात आपले उमेदवार उभे केल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बच्चू कडूंनी घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत (Legislative Council Elections) प्रहार जनशक्ती पक्ष (Prahar Jan Shakti Party) विरुद् भाजप-शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, अमरावतीच नाही तर आगामी 30 जानेवारीला होणाऱ्या पदवीधर (Graduate) आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये (Teacher Constituency Election) पाचही जागांवर आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. यासाठी मराठवाड्यातून डॉ. संजय तायडे (Dr. Sanjay Tayde), अमरावतीमधून किरण चौधरी (Kiran Chaudhary), कोकण विभागातून नरेश शंकर कौंडा (Naresh Shankar Kaunda), नागपुरातून अतुल रायकर (Atul Raikar) तर नाशिकमधून अ‍ॅड. सुभाष झगडे (Adv. Subhash Jagde) असे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यातील एक ते दोन जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकू असा विश्वास बच्चू कडू यांनी बोलून दाखवला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार उभे करण्याबाबतची सगळी कल्पना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती.
या निवडणुकीसाठी आम्ही मागील तीन वर्षापासून मेहनत घेत आहोत.
तीन ठिकाणी आम्ही प्रचंड मतनोंदणी केली आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला विचारात घेऊन उमेदवार उभा करावा.
शिंदे गट, प्रहार आणि भाजप (BJP) अशी युती करुन उमेदवार द्यावेत, अशी विनंती मी त्यांना केली होती.
परंतु त्यांचा काहीच निरोप न आल्याने आम्ही पाचही ठिकाणी उमेदवार उभे केल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Legislative Council Elections | bachchu kadu prahar candidate against shinde group and bjp assembly council election

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | अमोल मिटकरींचे राज्यपालांबाबतचे ‘ते’ ट्वीट चांगलेच चर्चेत

Rupali Chakankar | चित्रा वाघ यांच्या आरोपांना रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या- ‘महिला आयोगाने…’

Railway Bharti | राज्यातील दहावी पास तरूणांसाठी सेंट्रल रेल्वेकडून मोठे गिफ्ट; २४२२ जागांसाठी लवकरच होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पध्दत

 

Related Posts