IMPIMP

Pune Water Supply | वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम; पुण्यासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा विस्कळीत

by nagesh
Pune Water Supply | Power outages affect water supply; Water supply to Pune and Pimpri Chinchwad disrupted

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Water Supply | महा पारेषण (MSEDCL) कंपनीच्या ४०० केव्ही अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झाल्याने आज पहाटे साडेचार वाजल्यापासून शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला. त्याचा परिणाम प्रामुख्याने पाणीपुरवठ्यावर झाला असून पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे (Pune Pimpri Chinchwad Power Outages Affect Water Supply). पुणे शहरात आज सायंकाळी कमी दाबाने व उशीरा पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महापारेषणच्या लोणीकंद (Lonikand) व चाकण (Chakan) या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणार्‍या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी पहाटे साडेचार वाजता बिघाड झाली. त्यामुळे जवळपास संपूर्ण पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहरासह चाकण, लोणीकंद, वाघोली परिसराचा वीज पुरवठा खंडीत झाला. त्यात पाणी पुरवठा करणार्‍या पर्वती शुद्धीकरण केंद्रातील (Parvati Water Treatment Plant) वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सायंकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

 

पिंपरी चिंचवडमधील रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे आज संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांनी केले आहे.

 

पहाटे पासून वीज पुरवठा खंडीत झाल्याने भूमिगत टाक्यात पाणी असूनही अनेक सोसायट्यांना आपल्या इमारतीवरील टाक्यांमध्ये पाणी चढवता आले नाही.
तसेच अनेकांना सकाळी स्वयंपाक करता मिक्सरचा वापर करता आला नाही.
त्या परिस्थितीत स्वयंपाक करुन घाईघाईन ऑफिस गाठण्याची कसरत अनेक महिलांना करावी लागली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Water Supply | Power outages affect water supply; Water supply to Pune and Pimpri Chinchwad disrupted

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | वारजे येथे बांधा- वापरा व हस्तांतरीत करा तत्वावर 300 बेडस्चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Pune Corporation | बाणेर-बालेवाडी येथे 700 कोटी रुपये खर्चून कॅन्सर हॉस्पीटल उभारणार ! पैसे नसल्याने महापालिका बांधा-वापरा व हस्तांतरीत करा तत्वावर हे हॉस्पीटल उभारण्यास प्रयत्नशील

Pune Crime | निलेश घायवळ टोळीतील एकाला मोक्का प्रकरणात अटक

 

Related Posts