IMPIMP

Pune Yerwada Crime News | पुणे क्राईम न्यूज : येरवडा पोलिस स्टेशन – पुण्यात नशाकारक, गुंगीकारक औषधी गोळयांचा साठा जप्त

by nagesh
Pune Yerwada Crime News | Yerwada Police Station - Stock of Narcotic Drugs and Drugs Seized in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Yerwada Crime News | पुण्याच्या येरवडा परिसरातून पोलिसांनी नशाकारक, गुंगीकारक औषधी गोळयांचा (Intoxicating, Narcotic Pills) साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरूध्द येरवडा पोलिस स्टेशनमध्ये (Yerwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Yerwada Crime News)

 

असिफ अकबर शेख Asif Akbar Shaikh (19, रा. गल्ली नं. 7, राजीव गांधीनगर, येरवडा – Rajiv Gandhi Nagar Yerwada) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एकजण राजीव गांधी परिसरात मानवी मनावर परिणाम करणार्‍या नशाकारक आणि गुंगीकारक औषधी गोळयांची अवैध्यरित्या (Addictive Pills) विक्री करीत असल्या बाबतची माहिती पोलिस अंमलदार अमजद शेख (Police Amjad Shaikh) आणि अनिल शिंदे (Police Anil Shinde) यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचुन असिफ अकबर शेख याला अटक केली. त्याच्याकडे असलेल्या काळया रंगाच्या पिशवीमधून 2 हजार 200 रूपये किंमतीच्या नशाकारक व गुंगीकारक गोळयांच्या 22 स्ट्रीप्स जप्त करण्यात आल्या आहेत. (Pune Yerwada Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav), वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Sr PI Balkrishna Kadam), पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयदिप गायकवाड (PI Jaydeep Gaikwad) यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे (PSI Ankush Dombale), पोलिस अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, अमजद शेख, किरण घुटे, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे आणि अश्विन देठे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :-  Pune Yerwada Crime News | Yerwada Police Station – Stock of Narcotic Drugs and Drugs Seized in Pune

 

हे देखील वाचा :

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणार्‍या दोघांना अटक

IPS Vishwas Nangare Patil | आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आवाहन; म्हणाले – ‘माझ्या नावाने बनावट खातं, सावध रहा’

 

Related Posts