IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणार्‍या दोघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Market Yard Police Station - NIGHT Boys playing cricket beaten up by gang; Motorcycles, cars vandalized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | केसनंद (Kesnand) येथील एचपी पेट्रोल पंपाच्या समोरील बाजुस मोटारसायकल वरून जाणार्‍या तरूणास पकडून त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याच्या खिशातील दोन हजार रूपये जबरदस्तीने चोरून (Robbery In Pune) नेणार्‍या दोघांना लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ओंकार नरहरी आळंदे Omkar Narhari Alande (21, रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) आणि तानाजी अर्जुन जाधव Tanhaji Arjun Jadhav (21, रा. लाडबा वस्ती, केसनंद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात करम हसुन मनिहार (20, रा. केसनंद) याने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी सकाळी 11.30 वाजता फिर्यादी करम हे त्यांच्या मोटारसायकलवरून केसनंद येथील एचपी पेट्रोल पंपाच्या समोरून जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना धारदार शस्त्राने जखमी केले. त्यांच्याकडील दोन हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेले. करम यांनी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांनी ओंकार आळंदे आणि तानाजी जाधव याला अटक केली आहे.
ते दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी (Criminals On Pune Police Record) आहेत.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station – Two arrested for injuring youth with sharp weapon and robbing

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेकडून रस्ते दुरुस्तीची सुमारे 80 टक्के तर पावसाळी कामे 26 टक्के पुर्ण

Pune Mundhwa Keshav Nagar Crime | गाव गुंडांवर ठोस कारवाई आवश्यक ! सर्व नागरिकांनी एकत्र येऊन उपाययोजना करु, मुंढवा-केशवनगर मधील नागरिकांचा सूर

IPS Vishwas Nangare Patil | आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आवाहन; म्हणाले – ‘माझ्या नावाने बनावट खातं, सावध रहा’

 

Related Posts