IMPIMP

Punit Balan Group | सामान्य कुटुंबातील वैष्णवी पवारला ‘पुनीत बालन ग्रुप’चा आधार

by sachinsitapure
 Punit Balan Group | punit balan group to provide all possible help to vaishnavi pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – वयाच्या आठव्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्या खेळात आपली चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या कात्रज (Katraj) येथील वैष्णवी पवार (Vaishnavi Pawar) हिला आता ‘पुनीत बालन ग्रुप’ची (Punit Balan Group) मोलाची मदत लाभणार आहे. या दोन्हींमध्ये सहकार्य करार झाला असून त्याअंतर्गत वैष्णवीच्या क्रीडा साहित्य आणि स्पर्धांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून (Punit Balan Group) मदत दिली जाणार आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कात्रज दत्तनगर येथील सामान्य कुंटुंबातील वैष्णवी पवार हिने शालेय स्पर्धांपासूनच राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत धनुर्विद्या खेळात प्राविण्य दाखवून अनेक पदके मिळविली आहेत. ८ वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेतही तिने आपले कौशल्य दाखवले आहे. त्यानंतर रिकर ऑलम्पिक प्रकारातही तिने सिल्वर मेडल मिळविले होते. ‘युथ वर्ल्डकप चाचणी स्पर्धे’त ८० मुलींमध्ये ती चौथ्या क्रमांकापर्यंत पोहचली होती. आता पुढे ऑलम्पिक स्पर्धेत उतरण्यासाठी आवश्यक क्रिडा साहित्य आणि आर्थिक मदतीसाठी वैष्णवी हीचे प्रशिक्षक सुधीर पाटील यांनी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याकडे मदत मागितली होती. वैष्णवी हीची खेळातील प्रगती पाहून बालन यांनी तत्काळ तिला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि याबाबतच करारही करण्यात आला आहे. त्यामुळे आता वैष्णवीला या मदतीच्या माध्यमातून आणखी चांगली कामगिरी करता येणार आहे. वैष्णवीसह तिचे कुटुंबिय आणि प्रशिक्षक पाटील यांनी याबाबत ‘पुनीत बालन ग्रुप’चे (Punit Balan Group) आभार मानले आहेत.

‘‘केवळ आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने कोणताही खेळाडू खेळापासून वंचित राहू नये ही आमची भूमिका आहे.
त्यामुळे सर्वसामान्य कुंटुंबातून आलेल्या वैष्णवी सारख्या प्रतिभावान खेळाडूंना सर्वोतोपरी मदत करणं,
हे आमचं सामाजिक कर्तव्य आहे. याच भावनेतून तिच्यासोबत करार केला आहे.
भविष्यात ती आपल्या देशाचं आणि पुणे शहराचं नाव उंचावेल, असा विश्वास आहे.’’

पुनीत बालन, अध्यक्ष. (Puneet Balan, President)

Web Title : Punit Balan Group | punit balan group to provide all possible help to vaishnavi pawar

 

Pune Cyber Crime News | पोलीस निरीक्षकाचे फेसबुक हॅक करुन नातेवाईकांची केली फसवणूक

Aakash BYJU’S | आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा; इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार

Related Posts