IMPIMP

Rahul Gandhi | राहुल गांधींनी सत्य तेच सांगितले – तुषार गांधी

by nagesh
Rahul Gandhi | tushar gandhi supports congress leader rahul gandhi in swatantraveer savarkar controversy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात काँग्रेस (Congress) नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत चालत आहेत. सध्या त्यांच्यावर भाजप जोरदार टीका करत आहे. त्यांनी एके ठिकाणी सावरकरांवर (V. D. Savarkar) भाष्य केले होते. त्यामुळे राज्यात वाद निर्माण झाले आहेत. भाजपने राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या यात्रेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता या वादात तुषार गांधी Tushar Gandhi (महात्मा गांधी यांचे पणतू) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राहुल गांधींचे समर्थन केले आहे. गांधींनी सावरकरांविषयी सत्यच सांगितले आहे, असे तुषार गांधी (Tushar Gandhi) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

राहुल गांधी यांनी सत्यच सांगितले आहे. कारण, वि. दा. सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागून नंतर त्यांच्याकडून पेन्शन घेतली होती. त्यांनी इंग्रजांसाठी काम केले होते. त्यामुळे सत्य सांगायला आपण घाबरलो, तर आपण सत्याशी दगाबाजी करत आहोत, असे तुषार गांधी म्हणाले. त्यांनी राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे. तसेच मी देखील कित्येक दिवसांपासून भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा विचार करत होतो. जे पुरोगामी विचारांचे लोक आहेत, त्यांनी या यात्रेत सहभागी होणे जरुरी आहे. शेगावमध्ये ही यात्रा येत आहे. त्यामुळे आता मी या यात्रेत सहभागी होणार आहे. शेगाव माझे जन्मस्थळ आहे, असेही तुषार गांधी म्हणाले.

भाजप, शिंदे गट आणि मनसे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यात्रेदरम्यान वीर सावरकरांचा विषय आपल्या एका भाषणात काढला.
त्यांनी सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, असे म्हंटले.
तसेच एका ठिकाणी त्यांनी सावरकरांच्या सहीचे पत्र देखील दाखविले आहे.
त्यांच्या मते, सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून आपली सुटका करुन घेतली.
त्यानंतर त्यांनी रत्नागिरीत इंग्रजांचे काम केले. त्यांना इंग्रज पेन्शन देत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rahul Gandhi | tushar gandhi supports congress leader rahul gandhi in swatantraveer savarkar controversy

 

हे देखील वाचा :

Protest Against Rahul Gandhi | शिंदे गटाच्या आंदोलनातील ‘अपघात’ टळला, अन् ‘ती’ महिला सावरकरांच्या फोटोलाच जोडे मारायला निघाली, पण…

Pune Pimpri Crime | व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा मेसेज करुन 10 लाखांच्या खंडणीची मागणी, चाकण परिसरातील घटना

 

Related Posts