IMPIMP

Protest Against Rahul Gandhi | शिंदे गटाच्या आंदोलनातील ‘अपघात’ टळला, अन् ‘ती’ महिला सावरकरांच्या फोटोलाच जोडे मारायला निघाली, पण…

by nagesh
Protest Against Rahul Gandhi | protest against rahul gandhi by eknath shinde supporters mistakenly tried to hit veer savarkar photo instead of congress leader

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Protest Against Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात (Swatantryaveer Savarkar) वादग्रस्त विधान केले होते. पर्वा त्यांच्या एका भाषणात त्यांनी सावरकरांविरोधात विधान केले होते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घाबरून इंग्रजांना माफीनामा लिहिला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल हे अनेक वर्षे तुरुंगात राहिले, पण त्यापैकी कोणीही माफीनाम्यांची कोणतीही चिठ्ठी लिहिली नाही. पण सावरकरांनी घाबरल्यामुळे माफीनाम्यावर सही केली. सावरकरांनी त्यावेळी एकप्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला.’ असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते. (Protest Against Rahul Gandhi)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानंतर एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि भाजपने (BJP) या विधानाचा जोरदार निषेध केला होता. एकनाथ शिंदे गटाने काल पुण्यात राहुल गांधींविरोधात एक आंदोलन केले होते. त्या आंदोलनात राहुल गांधींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलनामध्ये उत्साही महिला कार्यकर्त्याकडून राहुल गांधींऐवजी सावरकरांच्या फोटोलाच चप्पल मारण्याचा प्रकार अगदी थोडक्यात टळला. (Protest Against Rahul Gandhi)

 

 

गुरुवारी पुण्यातील सारसबागेसमोरील (Sarasbagh) सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी आंदोलन सुरु केले. शिंदे गटाचे पुणे संपर्क प्रमुख अजय भोसले
आणि शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनातील बॅनरवर एका बाजूला राहुल गांधी यांचा लाल फुल्ली मारलेला आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

घोषणाबाजी सुरु असताना एका महिला कार्यकर्तीने अचानक पायातील जोडे काढून बॅनरवरील सावरकरांच्या
फोटोला मारण्यासाठी पुढे आली. या महिलेची चूक वेळीच एका कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्याने महिलेस
रोखलं आणि तिला तिची चूक दाखवून दिली. त्यामुळे ही महिला वेळीच थांबली.
मात्र, सामाजिक माध्यमांवर या व्हिडीओची प्रचंड चर्चा होत आहे.

 

Web Title :- Protest Against Rahul Gandhi | protest against rahul gandhi by eknath shinde supporters mistakenly tried to hit veer savarkar photo instead of congress leader

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा मेसेज करुन 10 लाखांच्या खंडणीची मागणी, चाकण परिसरातील घटना

Ravi Rana | ‘उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – रवी राणा

Sanjay Raut | ‘भाजपाकडून केवळ मतांच्या राजकारणासाठी वीर सावरकरांचा वापर’ – संजय राऊत

 

Related Posts