IMPIMP

Rakhi Sawant Separation | राखी सावंत झाली पती रितेशपासून वेगळी; 3 वर्षांनंतर मोडला विवाह

by nagesh
Rakhi Sawant Separation | rakhi sawant announces separation with husband riteish on social media

सरकारसत्ता ऑनलाइन – Rakhi Sawant Separation | भारतीय नृत्यांगना (Dancer) म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant Separation) तिच्या डान्समुळे कायम चर्चेत असते. दरम्यान गेल्या काही वर्षापासून तिचा विवाह आणि पती यामुळे ती समाज माध्यमांवर (Social Media) नेहमीच चर्चेत होती. शेवटी बिग बॉसच्या 15 व्या पर्वामध्ये राखी सांवतचा पती कोण याबाबत माहिती समोर आली होती. अखेर राखीनेच बिग बॉसमध्ये आपल्या पतीची ओळख करुन दिली होती. आता त्यांच्यात ताटातूट झाल्याचं समोर आलं आहे. राखीने पती रितेश (Ritesh) पासून अलिप्त होत असल्याचं सांगितलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राखी सांवतने (Rakhi Sawant Separation) आपण वेगळं होत असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. आमच्या दोघांमधील समस्या संपवण्याचा प्रयत्न केला. पण यात आम्ही यशस्वी झालो नाही. त्यामुळेच आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राखीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत पती रितेशपासून (Ritesh) वेगळं होत असल्याचं सांगितलं आहे.

 

 

”सर्व चाहते आणि माझ्या प्रिय व्यक्तींना मी सांगू इच्छिते, मी आणि रितेश एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या ज्या माझ्या नियंत्रणाच्या बाहेर होत्या. आम्ही पूर्ण प्रयत्न केले. मात्र अखेर आम्ही आमचं आयुष्य वेगवेगळं जगण्याचा निर्णय घेतला आहे.’हे सर्व व्हॅलेंटाइनडेच्या अगदीच अगोदर घडलं त्यामुळे मी खूप दु:खी आहे. पण एक निर्णय तर घ्यायचाच होता. पण मी प्रार्थना करते की रितेशसोबत सर्वकाही चांगलं होऊ दे. मला आता कामावर फोकस करायचं आहे. मला आनंदी आणि निरोगी राहायचं आहे. मला समजून घेण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी धन्यवाद..!” असं राखी सांवतने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

Web Title :- Rakhi Sawant Separation | rakhi sawant announces separation with husband riteish on social media

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police News | पोलीस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी; कुख्यात गुन्हेगार अखेर गजाआड

Sugarcane Juice Benefits | चवीला उत्कृष्ट असण्यासह आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतो उसाचा रस, जाणून घ्या असंख्य फायदे

Old And New Tax Slabs | कामाची बातमी ! जुन्या आणि नवीन टॅक्स स्लॅबची अशी करा निवड, नवीन व्यवस्थेत यांना मिळू शकतो फायदा

Brain Dead | विवाहाच्या आदल्या दिवशी मुलीचा मेंदूविकाराने मृत्यु; दु:खात असलेल्या कुटूंबीयांनी घेतला धाडसी निर्णय

 

Related Posts