IMPIMP

Brain Dead | विवाहाच्या आदल्या दिवशी मुलीचा मेंदूविकाराने मृत्यु; दु:खात असलेल्या कुटूंबीयांनी घेतला धाडसी निर्णय

by nagesh
Brain Dead | family of karnataka bride who collapsed at her wedding donates her organs

बंगळुरू : वृत्तसंस्था Brain Dead | मुलीच्या लग्नापुर्वीचे (Marriage) विधी पार पडत असताना अचानक तिला भोवळ आली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. तिला ब्रेन स्ट्रोकचा (Brain Stroke) त्रास झाला. रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्याने डॉक्टरांनी तिला ब्रेन मृत्यु (Brain Dead) झाल्याचं घोषित केलं. यानंतर कुटुंबांना एक मोठा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत मात्र कुटुंबानं मोठा निर्णय घेतला. मुलीचे अवयव दान करून गरजूंना नवं आयुष्य देण्याचा धाडसी निर्णय तिच्या कुंटूंबीयांनी घेतला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही घटना कर्नाटकातील (Karnataka) कोलार जिल्ह्यातल्या कोडिचेरुवू गावात घडली आहे. येथील चैत्रा के. आरचा (Chaitra.K. R) विवाह 7 फेब्रुवारीला होणार होता. आदल्या दिवशी विधी सुरू होते. नवरा-नवरीचे फोटो काढले जात होते. दोन्ही कुटुंब मजेत होते. पण तेवढ्यात चैत्रा चक्कर येऊन पडली. तिला बंगळुरूतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्समध्ये (National Institute Of Mental Health And Neuroscience) हलवण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं. प्रयत्नांची शर्थ करूनही डॉक्टरांना यश आले नाही. (Brain Dead)

 

दरम्यान, मुलीचा मृत्यु (Dead) झाल्याने तिच्या कुंटूंबीयावर एक मोठा दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, या दु:खातून सावरत मुलीच्या कुंटूंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. चैत्राच्या दोन्ही किडणी, हार्ट व्हॉल्व आणि कॉर्निया काढण्यात आला. राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण समितीद्वारे (State Level Organ Transplantation Committee) हे अवयव गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आले आहे.

 

Web Title :- Brain Dead | family of karnataka bride who collapsed at her wedding donates her organs

 

हे देखील वाचा :

Almonds Side Effects | आरोग्यासाठी लाभदायक आहेत बदाम, परंतु ‘या’ 5 लोकांसाठी ठरू शकतात नुकसानकारक

Sambhaji Raje | खासदार संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार’

DGP Sanjay Pandey | मुंबई ATS मध्ये जागा रिक्त, पोलीस महासंचालकांची फेसबुक पोस्ट चर्चेत

 

Related Posts