IMPIMP

Ravikant Varpe On Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा तो व्हिडिओ व्हायरल’, राष्ट्रवादीनं केली ‘ही’ मोठी मागणी

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray surgery postponed due to covid

सरकारसत्ता ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) औरंगाबादच्या (Aurangabad) दिशेने रवाना झाले आहेत. त्यांनी जाताना पुण्यातील (Pune) वढू तुळापूरमध्ये (Tulapur) छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. राज ठाकरेंचा तेथील दर्शन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (Ravikant Varpe On Raj Thackeray) आक्रमक पवित्रा घेत राज ठाकरेंचा छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंवर (Ravikant Varpe On Raj Thackeray) निशाणा साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज ठाकरेंच्या जुन्या व्हिडीओची चर्चा होत आहे त्यामध्ये, संभाजी राजे वडिलांशी भांडून मुघलांना मिळाले होते हेही तितकंच सत्य आहे. ज्यांच्याविरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली त्यांना जाऊन तुम्ही मिळालात हे सत्यच असल्याचं राज ठाकरे म्हणत आहे. याचाच धागा पकडत राज ठाकरेंनी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe On Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

 

 

राज ठाकरे शंभूराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला निघालेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत दुसऱ्यांचे व्हिडीओ लावणाऱ्यांना आपण भूतकाळात काय बोललोय याची मात्र जाणीव नाही. नतमस्तक व्हायला चाललाच आहात तर आता महाराजांच्या चरणी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी तेवढी मागा, असं म्हणत वरपे यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, राज ठाकरेंची उद्या औरंगाबादमध्ये सभा असल्याने औरंगाबादकडे मार्गस्थ झाले आहेत.
मात्र औरंगाबादमध्ये पोहोचण्याआधीच राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीकास्त्र केली आहे. राज ठाकरे या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Ravikant Varpe On Raj Thackeray | ncp tweets raj thackeray old video targeting chhatrapati sambhaji raje demands apology

 

हे देखील वाचा :

Urfi Javed Topless Video | टॉपलेस होऊन घराबाहेर पडली उर्फी जावेद, व्हिडिओतील तिचा अंदाज पाहून चाहते झाले घायाळ…

Gopichand Padalkar On Sharad Pawar | पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका; म्हणाले – ‘बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय’

Priyanka Chopra Bikini Look | प्रियंका चोप्राने शेअर केला बिकिनी लूक; फोटो पाहून सोशल मीडियाचा वाढला पारा…

 

Related Posts