IMPIMP

Rohit Pawar On Ajit Pawar | काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन तयार रहावं…, रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल

by sachinsitapure

बारामती :  – Rohit Pawar On Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) पवार विरुद्ध पवार (Pawar Vs Pawar) असा हाय व्होल्टेज सामना रंगला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर महायुतीकडून (Mahayuti) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठिकाणी निकराची लढाई होत असतानाच आता रोहित पवारांनी अजित पवार यांना जाहीर आव्हन दिलं आहे. बारामतीच्या सांगता सभेत रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्यानंतर अजित पवारांनी त्यांची खिल्ली उडवली होती. यानंतर आता रोहित पवारांनी अजित पवारांना पुन्हा आव्हान देत वस्तरा घेऊन मिशा काढण्यासाठी तयार रहावे असे म्हटले आहे.

विश्रांतीनंतर शरद पवार पुन्हा मैदानात

बारामतीमधील शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत बोलताना शरद पवार प्रकृती ठिक नसल्याचे दिसून आले होते (Sharad Pawar Health). सलग घेतलेल्या सभांनी शरद पवारांचा घसा बसला होता. अशा परिस्थितीमध्येही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्याने सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरणार आहेत. 8 मे पासून त्यांचे नियोजित कार्यक्रम सुरू होणार आहेत. रोहित पवार यांनी शरद पवारांच्या दौऱ्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. या ट्विटमधून त्यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन तयार रहावं

रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटले, ज्यांनी कॅन्सरलाही पराभूत केलं, भाजपसारख्या महाशक्तीलाही पाणी पाजलं, सत्तेच्या दबावाला सत्याच्या ताकदीवर झुकवलं तो आहे महाराष्ट्राचा सह्याद्री… अजिंक्य योद्धा आदरणीय पवार साहेब! अनेकजण एकाच मतदारसंघात अडकून पडले पण या योद्ध्याने गेल्या २२ दिवसात तब्बल ५२ सभा घेऊन भाजप सरकारविरोधात रान उठवलं…. आणि कालपासून तब्येत बरी नसताना आणि डॉक्टरांनी दौऱ्याला विरोध केला असतानाही हा योद्धा केवळ १ दिवसाची क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात निघालाय… हाती विचारांचं हत्यार घेऊन… म्हणतात ना… योद्धा कधी जखमांच्या वेदना उगाळत बसत नाही. काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन तयार रहावं. मिशा काढण्यासाठी.

Related Posts