IMPIMP

Rule Change | 1 जुलैपासून होतील ‘हे’ 5 मोठे बदल… स्वयंपाक घरापासून बँक खात्यापर्यंत दिसेल परिणाम!

by sachinsitapure

नवी दिल्ली : १ जुलैपासून देशात अनेक मोठे बदल (Rule Change From 1st July) होणार आहेत. यामध्ये एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder Price) च्या किमतीपासून क्रेडिट कार्ड (Credit Card Rule) च्या नियमांचा समावेश आहे. हे बदल थेट तुमच्या पैशांशी संबंधीत आहेत. या पाच मोठ्या बदलांबाबत जाणून घेऊया…

पहिला बदल : एलपीजीचे दर

ऑईल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत दुरुस्ती करतात. यामुळे १ जुलै २०२४ ला सकाळी सहा वाजता यामध्ये बदल दिसू शकतात. आता लोकसभा निवडणुका झाल्या असल्याने हे दर मोदी सरकार वाढवू शकते.

दुसरा बदल – एटीएफ आणि सीएनजी-पीएनजी रेट

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑईल मार्केटिंग कंपन्या हवाई इंधन म्हणजे एयर टर्बाइन फ्यूएल आणि सीएनजी-पीएनजीच्या दरात सुद्धा दुरूस्ती करतात. यामुळे १ जुलैला हे नवीन दर देखील समोर येऊ शकतात.

तिसरा बदल – क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

१ जुलै २०२४ पासून क्रेडिट कार्ड पेमेंट संबंधी मोठी बदल लागू होणार आहे. यामुळे काही पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे बिल पेमेंट करताना समस्या येऊ शकते. यामध्ये क्रेड, फोनपे, बिलडेस्क सारख्या काही फिनटेकचा समावेश आहे. आरबीआयच्या नवीन नियमानुसार, एक जुलैपासून सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम म्हणजे बीबीपीएसद्वारे केले पाहिजे.

चौथा बदल – सिम कार्ड पोर्ट रूल

ट्रायने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सिम स्वॅप फ्रॉडपासून बचाव होण्यासाठी ट्रायने हे नियम लागू केले आहेत. या अंतर्गत सिम कार्ड चोरी अथवा डॅमेज झाल्यास थोडी प्रतीक्षा करावी लागेल. यापूर्वी स्टोअरमधून ताबडतोब नवीन सीमकार्ड मिळत होते, परंतु आता त्याचा लॉकिंग पीरियड वाढवला आहे आणि यूजर्सला ७ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

पाचवा बदल – पीएनबी बँक खाते

तुम्ही पीएनबी बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्ही तुमचे खाते अनेक वर्षांपासून वापरले नसेल तर ते १ जुलै २०२४ पासून बंद होऊ शकते. ज्या पीएनबी अकाऊंटमध्ये ३ वर्षांपासून कोणतेही ट्रांजक्शन झालेले नाही आणि ज्यांचा अकाऊंट बॅलन्स झीरो असेल, तर त्या ग्राहकाने अकाऊंअ अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी ३० जूनपर्यंत शाखेत जाऊन केवायसी करायचे आहे, असे न केल्यास १ जुलैपासून खाते बंद होऊ शकते.

Related Posts