IMPIMP

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांनी पोलीस प्रशासनाची बाजू उचलून धरत पालकांना दिला दोष, ”१४ व्या वर्षी हातात मोबाईल…”

by sachinsitapure
Rupali Chakankar

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – मागील काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात तीन मुलींनी वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या (Suicide Of Three Young Girls) केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या (State Women Commission) अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सोलापूरमध्ये जाऊन मृत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पोलिस प्रशासन (Solapur Police) योग्य वेळी कारवाई करत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, अशा घटनांना पालक देखील तेवढेच जबाबदार असल्याचे म्हणत चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पोलिसांची बाजू उचलून धरली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलिसांची बाजू उचलून धरताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोग याआधी महाराष्ट्रात कुणालाही माहीत नव्हता. मी राज्यात फिरायला लागल्यानंतर आयोगाची कामगिरी सर्वांना दिसत आहे. महिला अत्याचारापासून (Women Abuse) मानवी तस्करी रोखण्यापर्यंतची कामे आम्ही केली. पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे त्यांचे काम करत आहे. पण ज्यावेळीस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो, तेव्हा कायदा व सुव्यवस्था काय करणार? चार भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो, चार भिंतीच्या आत होते त्याचे काय करणार?

रुपाली चाकणकर म्हणाल्या, मला छोट्या भगिनींना सांगायचे आहे की, शालेय जीवन जगत असताना अभ्यासाचा, उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रीत केले पाहीजे. १४ वर्षी एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात टीव्हीचा रिमोट असल्यामुळे हल्लीच्या मुली आभासी जगात वावरत असतात. कुणी दोन शब्द चांगले बोलले तर त्याला भुलणे आणि नको त्या भुलथापांना बळी पडण्याच्या गोष्टी घडत आहेत.

त्या म्हणाल्या, आई-वडील आपले वैरी आहेत की काय? अशी भावना हल्लीच्या मुला-मुलींमध्ये प्रकर्षाने दिसते. पालक चुकीचे सांगतात असे मानून मुले-मुली पालकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुले मोठी होत असताना पालकांनी संवादाची पद्धत बदलून मुलांना अधिक समजून घेतले पाहीजे.

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, आत्महत्येचा निर्णय घेण्यापर्यंत मुले कशी पोहोचतात? त्यांचे मन
इतके कमकुवत का झाले? याचाही विचार पालकांनी करायला हवा. पोलीस किती ठिकाणी जाणार? काही ठिकाणी तर
बापाकडूनच मुलींवर बलात्कार झाला आहे. मी स्वतः अशा नऊ प्रकरणांचा पाठपुरावा करत आहे.
ज्याला बाप-लेकीच्या नात्याची विण माहीत नाही. ज्याला स्वतःच्या भावनांची समज नाही, त्यांचे सर्वांचे प्रबोधन
करणे समाजाची जबाबदारी आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर या अजित पवार गटातील महिला नेत्या असून सध्या अजित पवार गट (Ajit Pawar Group)
सत्ताधारी पक्षात असल्याने चाकणकर यांनी गृहखात्यासंबंधिचा प्रश्न टाळत पोलीस प्रशासनाची बाजू उचलून धरली काय?, असा सवाल विचारला जात आहे.

Related Posts