IMPIMP

Sadabhau Khot | ‘…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावायला कमी करणार नाही’; माजी मंत्र्याचा परिवहन मंत्र्यांना इशारा !

by nagesh
ST Workers Strike | 250 crore employees lost due to st strike with losses of one and a half to four lakhs each

सरकारसत्ता ऑनलाइन – Sadabhau Khot | एसटी कामगारांच्या संपाला जवळजवळ सहा महिन्यांचा कालावधी लोटला असावा. मात्र अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही. राज्य सरकार एसटी महामंडळात (MSRTC) नोकरभरती करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे नेते सरकारमधील मंत्र्यांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी थेट परिवहन मंत्र्यांनाच इशारा दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एसटी कामगारांचा संप मोडायचा ही सरकारची भावना आहे. या सरकारने खाजगीकरणाचा (Privatization) घाट घातला असून खाजगीकरण करून हे हप्ते वसुल करणार असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कामगारांच्या प्रश्नावर संवेदनशील मार्गाने तोडगा निघत नसेल तर अनिल परब (Anil Parab) यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलनाला बसू. एसटीमध्ये काम करणारी माणसं ही साधी आणि खेड्यापाड्यातली आहेत. जर तुम्ही आमच्या माणसांना बांबू लावणार असताल तर आम्हीही त्यांना बाबू लावायला कमी करणार नाही, असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले.

 

एसटी (ST) महाराष्ट्राचं वैभव आहे, असं म्हणता खोत यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही निशाणा साधला.
सुप्रिया सुळे आणि पवारसाहेबांना युक्रेनमधील (Ukraine) विद्यार्थ्यांची चिंता आहे.
मग ते महाराष्ट्राच्या (Maharashtra) विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एसटीवर का बोलत नाहीत ?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेवर अनिल परब काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एसटीवरून भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही सरकारवर निशाणा साधला होता.

 

Web Title :- Sadabhau Khot | ex minister sadabhau khot attacked transport minister anil parab over msrtc stike st employee agitation msrtc

 

हे देखील वाचा :

Tips For Asthma Patients | अस्थमाने असाल त्रस्त तर ‘या’ गोष्ठी लक्षात ठेवा, धाप लागण्याच्या त्रासापासून मिळू शकतो आराम

7th Pay Commission | पेन्शन-DR वर मोदी सरकारने 4 वर्षांसाठी दाखवला हिरवा झेंडा, ‘या’ लोकांना फायदा

Sanjay Raut | IT, ED ला हाताशी धरुन सरकार पाडण्याचा डाव, संजय राऊतांचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Donate A Pension Scheme | केंद्र सरकारने असंघटित मजूरांसाठी सुरू केली ‘डोनेट ए पेन्शन स्कीम’, दरमहिना मिळतील 3 हजार रुपये; जाणून घ्या सर्वकाही

 

Related Posts