IMPIMP

Sadbhavana Nirdhar Sabha Pune | ‘महाविकास’-डाव्या-पुरोगामी’ पक्ष संघटनांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात सद्भावना निर्धार सभेचं आयोजन (Video)

by nagesh
Sadbhavana Nirdhar Sabha Pune | Mahavikas Aghadi Left party Progressive Party Organizes Sadbhavana Nirdhar Sabha in Pune on the occasion of Maharashtra Day (Video)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Sadbhavana Nirdhar Sabha Pune | महाराष्ट्राचा एकोपा राखण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि डाव्या व पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day) पुण्यात (Pune News) 30 एप्रिल रोजी सद्भावना निर्धार सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. यादिवशी आम्ही सर्व महाराष्ट्र राज्य स्थापनेची ही उद्दिष्ट्ये पुन्हा एकदा उद्घोषित करून आमची त्याविषयीची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन केलं आहे. असं सांगण्यात आलं आहे. (Sadbhavana Nirdhar Sabha Pune)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेवून जनतेच्या लोकशाही राज्यासाठी एका प्रखर संघर्षातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही या मूल्यांवर आधारित राज्य निर्माण करण्याची शपथ त्या दिवशी या राज्यातील जनतेने घेतली. हे लक्षात घेता यावर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 30 एप्रिलला सभेचे आयोजन केलं आहे. (Sadbhavana Nirdhar Sabha Pune)

 

 

 

केंद्र सरकारची (Central Government) एक पक्षीय नोकरशाही व जुलूमशाही लावण्याचे उद्दिष्ट स्पष्टपणे दिसतेय. संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दडपून राज्यांचे करविषयक अधिकार, राज्यांचे कर उत्पन्न, कामगार तसेच शेती विषयक कायदे, कायदा सुव्यवस्थेबाबतचे अधिकार तसेच नोकरशाहीवरील नियंत्रणाचे अधिकार अशा प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची जाणीवपूर्वक कोंडी केली जातेय. राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी केंद्रिय यंत्रणांचा बेबंद गैरवापर केला जातोय. महाराष्ट्रातील जनता केंद्राची ही घटनाविरोधी दादागिरी सहन करणार नाही. हा निर्धार या सभेतून केला जाणार असल्याचं म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

केंद्र सरकारचे पेट्रोल – डिझेल सारख्या वस्तूंवरील करांमधून मिळणारे उत्पन्न गेल्या 7 वर्षात साडे 300 टक्के वाढले आहे.
गॅसवरील अनुदान रद्द केले गेले. यावरुनही आघाडी सरकार त्याला प्रतिकार केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता लोकमान्य टिळक, अलका टॉकिज चौक (Lokmanya Tilak, Alka Talkies Chowk) येथे काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena)
तसेच डावे, पुरोगामी पक्ष संघटनांच्यावतीने (Progressive Party Organizations) महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe),
शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे (Sanjay More), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित अभ्यंकर (Ajit Abhyankar),
सुराज्य सेनेचे सुभाष वारे (Subhash Ware), भाकपचे अरविंद जक्का (Arvind Zakka),
अंगमेहनती कष्टकरी संघटनेचे नितीन पवार (Nitin Pawar) व जनआंदोलन समितीचे इब्राहिम खान (Ibrahim Khan) आदी या सभेला उपस्थित असणार आहेत.

 

Web Title :- Sadbhavana Nirdhar Sabha Pune | Mahavikas Aghadi Left party Progressive Party Organizes Sadbhavana Nirdhar Sabha in Pune on the occasion of Maharashtra Day (Video)

 

हे देखील वाचा :

Calcium Deficiency | हातापायात वेदना असू शकते कॅल्शियमच्या कमतरतेचा संकेत, जाणून घ्या उपाय

Ajit Pawar On Ashish Shelar | ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या ‘त्या’ सरकारवर अजित पवारांनी केलं भाष्य, म्हणाले – ‘शेलार 5 वर्षे कशाला थांबले ?’

Heart Attack & Chest Pain Symptoms | छातीत होणारी वेदना हार्ट अटॅक आहे की चेस्ट पेन? जाणून घ्या कसे ओळखावे

 

Related Posts